संपादकीय

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी थेट नाव घेतलेले वसीम रिझवी कोण?

 

मुंबई | त्रिपुरातील कथित हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातील अमरावती आणि नांदेडमध्ये दिसून आले आहेत तसेच या जिल्यात पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. त्यादरम्यान पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. अमरावतीप्रमाणे नांदेड आणि मालेगावातही त्याचे पडसाद उमटले. दरम्यान, अमरावतीतील हिंसाचारानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वसीम रिझवी यांचं नाव घेतलं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. वसीम रिझवी हे शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत.

नवाब मलिक म्हणाले, “वसीम रिझवी शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन होते, त्यांनी अफरातफरी केली. २०१६-१७ मध्ये त्यांच्याविरोधात तक्रार झाली. त्यामुळे त्यांच्याविरोधात लखनऊमध्ये अनेक तक्रारी झाल्या. ते लखनऊचे खासदार असताना मोदी साहेब, राजनाथ सिंह साहेबांकडे तक्रारी करण्यात आल्या. एक वर्षापूर्वी हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मात्र पुढे काय झालं माहिती नाही. वसीम रिझवींवर तात्काळ कारवाई करावी, देशातील शांतता बिघडेल असं वातावरण त्यांनी निर्माण करु नये, तसं लिखाण त्यांनी करु नये, जे कोणी या हिंसेला जबाबदार असेल त्यावर कारवाई करावी”

वसीम रिझवी गेल्या दोन चार वर्षापासून या देशातील सलोखा कसा बिघडेल अशी विधानं करत आहेत, काही पुस्तक लिहित आहेत. लोकांच्या भावना भडकवत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. नियोजन पद्धतीने देशातील वातावरण कसं बिघेडल हे वसीम रिझवीच्या माध्यमातून सुरु आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
त्रिपुरात जी हिंसा झाली, त्याच बरोबर शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता, यादरम्यान महाराष्ट्रातही बंद पुकारण्यात आला होता. मात्र बंदनंतर तीन जागी हिंसा झाली. या हिंसेचा आम्ही कठोर शब्दात निंदा करतो. ज्या संघटना लोकांना असं आवाहन करत आहेत, त्यांची जबाबदारी असते की आंदोलन किंवा निषेध दर्शवणे हा लोकांचा अधिकार आहे, पण अनगाईडेड मिसाईलसारखं त्यावर नियंत्रण नसणं योग्य नाही, असं नवाब मलिक म्हणाले.

Back to top button