संपादकीय

भाजप येणार, मुंबई घडवणार… भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी फुंकले रणशिंग

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर सर्व पक्षांचे डोळे मुंबई महानगर पालिका निवडणुकीकडे लागले आहेत त्यातच भारतीय जनता पक्षाने सुद्धा मुंबई मनपा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भाजपचा भगवा फडकवायला, असा चंग भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी बांधला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुंबईत भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत सदस्यांना मार्गदर्शन करताना मुंबई महापालिका जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

आसाममधील आमदारांच्या मार्गदर्शन शिबिराच्या निमित्ताने नड्डा हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरही त्यांनी निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकार लोकशाही मार्गानेच हटवू आणि आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारण्यात भाजप यशस्वी होईल, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला.

भाजप येणार, मुंबई घडवणार… असा नारा देत मुंबईतील भाजपा पदाधिकारी आणि आमदारांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं होत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेश स्तरावरील काही ज्येष्ठ नेत्यांशी आणि आमदार मंगलप्रभात लोढा व अतुल भातखळकर यांच्याशी आगामी निवडणुकांच्या तयारीविषयी संघटनात्मक बाबींवरही नड्डा यांनी चर्चा केली. त्यानंतर मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली.

Back to top button