📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

 

जामखेड प्रतिनिधी:-जामखेड शहरातील दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीत इयत्ता १ ते ५च्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या सहलीत विद्यार्थ्यांना ओझर, भिमाशंकर,डिंभे धरण मंचर येथे भेट देण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी ऐतिहासिक/भौगोलिक/वैज्ञानिक/निसर्गरम्य स्थळ याविषयी माहिती मिळवली. प्रशिक्षित मार्गदर्शकांनी त्यांना ठिकाणाची संपूर्ण माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी या सहलीत खूप नवीन गोष्टी शिकल्या आणि त्यांचा अनुभव समृद्ध झाला. शाळेच्या शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी या सहलीचे उत्तम आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेतला आणि भविष्यात अशा सहलींचे आयोजन करण्याची मागणी यावेळी पालकांनी केली. सहलीच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज पवार आदींसह सर्व शाळा व्यवस्थापक समिती, मुख्याध्यापक बळीराम अवसरे ,उपाध्यापिका जया चौभारे,प्रताप पवार,शुभांगी साळुंके, शितल कदम,संजय आरेकर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद, वाहक गणेश चिंचकर आदींनी परिश्रम घेतले.सहल सुखरूप व यशस्वी पार पाडल्याबद्दल वाहक गणेश चिंचकर यांचा सन्मान करण्यात आला.

Back to top button