संपादकीय

स्वराज प्रतिष्ठान जामखेड यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत…!

जामखेड (प्रतिनिधी): स्वराज प्रतिष्ठान जामखेड यांच्या वतीने स्वराज नगर,तपनेश्वर गल्ली या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सव 2025 निमित्त प्रथमच माता दुर्गा देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
या सार्वजनिक उत्सवाचे औचित्य साधत तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देत स्वराज प्रतिष्ठान यांच्या वतीने जामखेड तालुक्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी जीवनाश्यक किराणा वस्तूची मदत करण्यात आली.स्वराज प्रतिष्ठान जामखेड यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या विनंतीला, सकारात्मक प्रतिसाद देत स्वराज नगर परिसरातील एकूण 28 व्यक्तींनी पूरग्रस्तांप्रती अंत:करणपूर्वक संवेदनशीलता जोपासत किराणा किटच्या स्वरूपात मदत केली. ही मदत प्रति व्यक्ती 750 /- रू याप्रमाणे एकूण बावीस हजार सातशे पन्नास (22750/- ) रुपयांची होती.
हरिश्चंद्र पवार,नितीन शेटे,वसुधा शेटे,सागर बाबर,प्रविण होळकर ,प्रशांत होळकर,संतोष होळकर ,नितीन शिंदे ,भरत औटे,कृष्णकुमार मुरूमकर ,शितल मुरूमकर ,अमोल लोहार ,सारंग परदेशी ,विनोद पोले ,श्रीकांत ढोबळे ,योगेश कानाडे ,प्रदिप तपसे ,सुभाष थोरात ,धीरज जाधव , नितीन शास्त्रकार ,मयुर अंदुरे ,मंगेश मोरे,संदिप देवा जोशी,महेश परदेशी ,अक्षय शेळके ,प्रदिप (कुंडल) राळेभात अरुण वाळुंजकर,बाळासाहेब साळवे व निनावे या मदत करणाऱ्या व्यक्तीचे स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण होळकर यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

Back to top button