बीड

जि.प.अहिल्यानगर येथील शिक्षण विस्तार अधिकारी व संपर्क अधिकारी माननीय पोपटजी धामणे साहेब यांची सारोळा प्रशालेस सदिच्छा भेट..!

जि.प.अहिल्यानगर येथील शिक्षण विस्तार अधिकारी व संपर्क अधिकारी माननीय पोपटजी धामणे साहेब यांची सारोळा प्रशालेस सदिच्छा भेट..!

जामखेड (प्रतिनिधी):गुरुवार,दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील शिक्षण विस्ताराधिकारी तथा संपर्क अधिकारी आदरणीय पोपटजी धामणे साहेब यांनी जि.प.प्रा.शाळा सारोळा या प्रशालेस सदिच्छा भेट दिली.यावेळी साहेबांचा तसेच त्यांच्या समवेत उपस्थित असणारे जि.प.प्रा.शाळा पिंपळगाव उंडा येथील मुख्याध्यापक तथा विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदजी सातपुते सर यांचा सारोळा प्रशालेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
या भेटी दरम्यान आदरणीय धामणे साहेब साहेबांनी माजी विद्यार्थी संघ,संचमान्यता याचा आढावा घेतला.तसेच माझी आदर्श शाळा उपक्रम अंतर्गत शाळा स्वयंमूल्यांकन याचे परीक्षण केले .त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र ३ याचा आढावा घेऊन या दोन्ही योजनेच्या मूल्यांकन प्रक्रियेत सारोळा शाळा अग्रेसर राहण्याच्या दृष्टीने आवश्यक व सखोल मार्गदर्शन केले.तसेच मिशन आरंभ परीक्षेचे इ.५ वी मधील गुणवंत विद्यार्थी चि.साईराज आजबे ,कु.शाश्वती लिमकर व इ.८ वी मधील गुणवंत विद्यार्थी साक्षी मुळे, वर्गशिक्षक अनुक्रमे अमृता रसाळ मॅडम व राहुल लिमकर सर,तसेच यशस्वी शाळेचे टीम लीडर म्हणून मुख्याध्यापक माजीद शेख सर यांचा साहेबांनी आवर्जून यथोचित सन्मान केला.तसेच मिशन आरंभ परीक्षेतील इ.५ वी १७ पात्र विद्यार्थी, इ.८ वी ९ पात्र विद्यार्थी, जिल्हास्तर विविध गुणदर्शन स्पर्धा ,जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा, इस्रो परीक्षा या सर्व विद्यार्थी यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शालेय परिसरातील परसबागला भेट देऊन त्याचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी जि.प.अहिल्यानगर येथील शिक्षण विस्तार अधिकारी पोपटजी धामणे साहेब, पिंपळगाव उंडा शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद सातपुते,सारोळा शाळेचे मुख्याध्यापक माजीद शेख सर,पदवीधर शिक्षक राहुल लिमकर सर,उपाध्यापक प्रशांत होळकर सर,उपाध्यापिका शबाना शेख मॅडम,अमृता रसाळ मॅडम तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Back to top button