📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जागतिक महिला दिनी परीक्षा केंद्राची धुरा महिला शिक्षिकांच्या हाती

जागतिक महिला दिनी परीक्षा केंद्राची धुरा महिला शिक्षिकांच्या हाती
ल.ना.होशिंग विद्यालयात ‘मिशन आरंभ’ परीक्षा यशस्वी
जामखेड प्रतिनिधी :दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल. ना. होशिंग विद्यालय, जामखेड येथे दि. ८ मार्च २०२६ रोजी ‘मिशन आरंभ’ अंतर्गत परीक्षा प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी १० वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
विशेष म्हणजे या परीक्षा केंद्रावरील सर्व कामकाज महिला शिक्षिकांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले. या परीक्षेसाठी केंद्रसंचालक व पर्यवेक्षक म्हणूनही महिला शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रावर एकूण ४६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण २० ब्लॉकमध्ये व्यवस्थित बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
परीक्षा सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी श्री.जालिंदर खताळ तसेच गटशिक्षणाधिकारी श्री.प्रदीप चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. महिला शिक्षिकांच्या समन्वयातून परीक्षा प्रक्रिया शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
Back to top button