म्हसळा बायपासजवळील ‘ग्रिल हाऊस’चे खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन; राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
म्हसळा (संदेश घोलप):
म्हसळा बायपास जवळ नूतन ‘ग्रिल हाऊस’चा भव्य उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि रायगडचे लोकप्रिय खासदार श्री. सुनीलजी तटकरे यांच्या शुभहस्ते गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमा प्रसंगी म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील अनेक प्रमुख लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली होती. खा. सुनील तटकरे यांनी ग्रिल हाऊसच्या संचालकांना नूतन व्यवसायासाठी आणि भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला तालुक्यातील माजी सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध सेलचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला व युवा प्रतिनिधी, तसेच सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आवर्जून उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उद्घाटन प्रसंगी उपस्थितांनी हॉटेलच्या उत्कृष्ट रचनेचे व सुविधांचे कौतुक केले.