बीड

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत देवदर्शन

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत देवदर्शन

येरमाळा, तुळजापूर, अक्कलकोट यात्रेचे आयोजन; आप्पासाहेब ढगे यांचा सामाजिक उपक्रम

जामखेड प्रतिनिधी :

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपटी गावातील युवा नेते,उपसरपंच तथा भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख आप्पासाहेब रमेश ढगे यांच्या वतीने महिलांसाठी येरमाळा, तुळजापूर व अक्कलकोट येथे मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळपासूनच भाविक महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलांची सुरक्षित व सोयीस्कर व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती.
आप्पासाहेब ढगे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. सांप्रदायिक कार्याची विशेष आवड असल्याने जनतेशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे.
विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनातून आपटी गावात विविध विकासकामे मंजूर करून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आप्पासाहेब ढगे सातत्याने प्रयत्नशील असतात. भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक, तसेच आपटी गावचे बिनविरोध उपसरपंच म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत.
या देवदर्शन यात्रेमुळे महिलांना अध्यात्मिक समाधान मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत असून आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Back to top button