बीड
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले भगवानगडाचे आशीर्वाद

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले भगवानगडाचे आशीर्वाद
महंत नामदेव महाराज शास्त्री व धनंजय मुंडे यांच्यात एक तासभर गुप्त बैठक
भगवानगड :- भगवानगडाचे निस्सीम भक्त लोकनेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज श्री क्षेत्र भगवानगडावर येऊन ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. बाबांच्या समाधीदर्शनानंतर मुंडेंनी गडाचे द्वितीय महंत वै.गुरुवर्य श्री संत भीमसिंह महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर गुरुगादीजवळ येऊन भगवानगडाचे विद्यमान मठाधिपती, ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले. शास्त्रीजींच्या दर्शनानंतर माजीमंत्री धनंजयजी मुंडे यांनी शास्त्रीजींसमवेत भगवानगडावर सुरु असलेल्या भव्य दिव्य श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराची पाहणी केली. मंदिराचे भव्य व आकर्षक बांधकाम पाहून माजीमंत्री धनंजयजी मुंडेंनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर महंतांच्या निवासस्थानी येऊन धनंजयजी मुंडे व गडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्रीजींसोबत प्रसाद ग्रहण केला. प्रसाद ग्रहणानंतर महंत नामदेव महाराज शास्त्रीजी व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यात एक तासभर गुप्त बैठक झाली. गडावरून निघताना मुंडेंनी परत श्रीगुरु नामदेव महाराज शास्त्रीजींचे दर्शन घेऊन पुढील दौऱ्याला सुरुवात केली.



