ए पि एल राशन कार्डधारक शेतकऱ्यांचे अनुदान तात्काळ खात्यात जमा करावे जमा करा:- बाळासाहेब मोरे पाटील
अन्यथा शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंच आंदोलन करणार
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रात आजपर्यंत सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात झालेल्या आहेत असे असतानाही बीड जिल्ह्यातील एपीएल धारक शेतकऱ्यांना शासनातर्फे धान्न्याऐवजी थेट अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे मात्र आजपर्यंत जिल्ह्यातील हजारो लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत याबाबत शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी जिल्हाधिकारी साहेब बीड यांना वारंवार निवेदन देऊनही शेतकऱ्याचे हक्काचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले नाही तात्काळ हे अनुदान जमा करण्यात यावे व याबाबत दिरंगाई करणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार तसेच सर्व तालुक्यांचे पुरवठा अधिकारी यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवशक्ती भीमशक्ती विचारमंचच्या वतीने माननीय पालकमंत्री अजितदादा पवार यांना प्रजासत्ताक दिनी निवेदन देण्यात येणार आहे