बीड

आज  प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून

आज  प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये हाडांच्या आजारांवर मोफत शस्त्रक्रिया

बीड (प्रतिनिधी):
जैन सोशल फेडरेशन, अहमदनगर संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल, जालना रोड, शाहू बँकेजवळ, बीड येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत आहेत.

वाढत्या वयानुसार अनेक रुग्णांना हाडे व सांध्यांचे विकार उद्भवतात. मात्र प्रत्येक वेळी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासेलच असे नाही. योग्य व्यायाम, आधुनिक उपचार पद्धती व फिजिओथेरपीच्या सहाय्याने अनेक आजारांवर प्रभावी उपचार शक्य आहेत. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग उपचारांसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री तसेच आधुनिक फिजिओथेरपी सुविधा उपलब्ध असून रुग्णांना आजारानुसार योग्य उपचार व सविस्तर मार्गदर्शन दिले जाते.

रुग्णांच्या आजाराचे अचूक निदान करण्यासाठी एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय, रक्ततपासणी आदी आवश्यक तपासण्या केल्या जातात. या सर्व तपासण्या अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मोठ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्यास पात्र रुग्णांवर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते.

दरम्यान, आज रविवारदिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी  या वेळेत आनंदऋषीजी हॉस्पिटल, बीड येथे आस्थिरोग तपासणी  शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी तसेच सांधे बदल (Joint Replacement) संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉरोहन धोत्रे (अहमदनगर) उपस्थित राहणार असून तपासणी शुल्क फक्त १०० ठेवण्यात आले आहे. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. योजनेस पात्र नसलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CM Relief Fund) अंतर्गत उपचार मिळवून देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

तरी बीड शहर व परिसरातील अस्थिरोग रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button