वसीम (बिल्डर) कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त ; १४५ रक्तदात्यांचे रक्तदान, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

वसीम (बिल्डर) कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त ; १४५ रक्तदात्यांचे रक्तदान, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
जामखेड प्रतिनिधी-जामखेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते वसीम (बिल्डर) कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त मिञ परिवाराच्या वतीने शहरातील खर्डा चौक परिसरातील शासकीय विश्रामगृह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये १४५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले आहे. कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. तसेच त्यांच्या चालू वर्षीच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी हज कमिटी चे सदस्य सलिम बागवान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष उमर कुरेशी,माजी उपनगराध्यक्ष शाकिर खान, फईम शेख ,मजहर खान ,सतिश अवसरे, ग्रामपंचायत सदस्य अन्सार शेख आदी मान्यवर उपस्थित होते.



