बीड
गोरक्षनाथ टेकडी येथे लाखो भाविकांच्या मेळ्यात अमृत महोत्सवी सप्ताह सांगता

गोरक्षनाथ टेकडी येथे लाखो भाविकांच्या मेळ्यात अमृत महोत्सवी सप्ताह सांगता
नवनाथ ग्रंथातील गर्भगिरी पर्वत म्हणजेच “गोरक्षनाथ टेकडी”:- ह भ प गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा
नाथांचे ज्ञान गोरक्षनाथ भगवंतांनी संभाळले :-ह भ प अक्रूर महाराज साखरे
बीड (प्रतिनिधी) विसाव्या शतकातील महान संत श्री ह भ प वै. सदगुरू किसन बाबा महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व ह भ प गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज मठाधिपती श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 75 वे अमृत महोत्सवी वर्षाची सांगता गुरुवर्य शांती ब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांच्या धर्मनाथ बीज विषयी महत्व सांगणारे प्रवचन करण्यात आले ह भ प अक्रूर महाराज साखरे यांच्या काल्याच्या कीर्तन व महाप्रसादाचा महापंगतीने सांगता करण्यात आली
गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांनी धर्मनाथ बीज का साजरी केली जाते.तिचे काय महत्व आहे हे सांगताना बाबा म्हणाले नवनाथ ग्रंथा मध्ये गुरु मच्छिंद्रनाथ महाराज व गोरक्षनाथ महाराज भ्रमण करताना गोरक्षनाथ महाराजांनी गर्भगिरी पर्वत सोन्याचा केला ते सोन्याचा केलेला गर्भगिरी पर्वत म्हणजेच आपली गोरक्षनाथ टेकडी आहे नाथ संप्रदायात गहिनीनाथ महाराज यांना गुरु गोरक्षनाथ महाराज यांनी ज्ञान दिले तो आज चा दिवस नाथ संप्रदाय मध्ये धर्मनाथ बीज रूपाने साजरा केला जातो
धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सांगतेचे काल्याच्या कीर्तनात ह भ प अक्रूर महाराज साखरे यांनी नाथांचे ज्ञान गोरक्षनाथ भगवंतांनी सांभाळले तो ज्ञानाचा धर्म रथ धर्म रूपाने गहिनीनाथ महाराज यांना समर्पित केला म्हणून आज ते ज्ञान संपूर्ण जगाला कामी आले आहे अशा ज्ञानाला सर्व नाथ संप्रदायातील नवनाथांनी टिकवले व ज्ञानाचा धर्म रथ म्हणजेच धर्मनाथ बीज हा सोहळा श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व जाती- धर्म पंथ सर्वांना एकत्रित करत गुरुवर्य महंत शांती ब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला असे ह भ प अक्रूर महाराज साखरे यांनी काल्याच्या कीर्तनात सांगितले काल्याचे संपन्न झाला
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे श्री ह भ प वै. सदगुरू किसान बाबा महाराज यांनी 75 वर्षांपूर्वी धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरवात केली होती त्या सप्ताहचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने गुरुवर्य शांती ब्रह्म नवनाथ बाबा महाराज कुशल मार्गदर्शनाखाली सप्ताह मध्ये हरी किर्तन, प्रवचन, भावार्थ रामायण, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, विष्णु सहस्रनाम, संगीत भजन हरी जागर असे कार्यक्रम सप्ताह मध्ये झाले
चौकट:- *किसान बाबा यांनी सुरू केलेली भाकरीची पंगत परंपरा*
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गुरुवर्य वै. सदगुरू किसान बाबा महाराज यांनी परिसरातील गावातून भाकरी जमाकरून टेकडीवर पंगत घेऊन 70 ते 80 गावातील भाविक भक्त घेऊन येतात संपूर्ण 8 दिवस अखंड भाविक भक्तांची भोजन व्यवस्था केली जाते.
चौकट:- *संन्याशाची गुरु शिष्य परंपरा जपणारी गोरक्षनाथ टेकडी*
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी हि नाथ संप्रदायातील संन्याशाची गादी आहे येथे गुरुशिष्य परंपरा जपणारी गादी आहे गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या साधनेतून, तपाने सिद्ध झालेली भूमी आहे गुरु वै.साधू बाबा महाराज, गुरु वै.किसन बाबा महाराज, गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज अशी गुरु शिष्य परंपरा आहे
चौकट:- *ऐतिहासिक पार्श्वभूमी आध्यात्मिक महत्व*
नवनाथ ग्रंथामध्ये गुरु मच्छिंद्रनाथ महाराज व गुरु गोरक्षनाथ महाराज भ्रमण करताना गोरक्षनाथ महाराजाने सोन्याची विट फेकून सोन्याचा डोंगर केला तोच हा नवनाथ ग्रंथा मधील गर्भगिरी पर्वत म्हणजे गोरक्षनाथ टेकडी
*मान्यवरांची उपस्थिती:-
मनोज जरांगे पाटील, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री बदामराव पंडित, राजेंद्र मस्के, योगेश क्षीरसागर, गंगाधर काळकुटे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते
चौकट:-गुरु गोरक्षनाथ महाराज, साधू बाबा, किसान बाबा यांची झोपडी आज ही आहे तशी गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांनी जतन करून ठेवली आहे आहे
चौकट:- गोरक्षनाथ टेकडीवर ऊर्जा केंद्र
•गुरु गोरक्षनाथ महाराज मंदिर
• गुरु किसन बाबा व साधू बाबा महाराज समाधी
•तुळजाभवानी माता मंदिर
•दत्ता गुरु यांचे अत्यंत देखणी मूर्ती व मंदिर
• गुरुवर्य वैकुंठवासी किसान बाबा साधू बाबा महाराज यांच्या सानिध्यातून कडूलिंब हे त्याची आज हि पान गोड लागतात


