📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

वै.किसनबाबांच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेल्या गोरक्षनाथगडावर लाखो भाविकांची उपस्थिती-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

वै.किसनबाबांच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेल्या गोरक्षनाथगडावर लाखो भाविकांची उपस्थिती-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड दि.20(प्रतिनिधी)ः- येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र गोरक्षनाथगडावर धर्मनाथ बीज निमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प.अक्रूर महाराज साखरे यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तन प्रसंगी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर उपस्थित होत.े ते म्हणाले की, वै.किसन बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोरक्षनाथगडावर लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती दिसू लागली आहे.

मंगळवार वै.ह.भ.प.किसनबाबा महाराज यांच्या आशीर्वादाने व मठाधिपती नवनाथ बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र गोरक्षनाथगडावर आयोजित करण्यात आला होता. मंगळवार दि.20 रोजी ह.भ.प.अक्रूर महाराज साखरे यांचे काल्याचे किर्तन होते. याप्रसंगी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, ह.भ.प.अखंडानंद गिरी महाराज, माजी आमदार बदामराव पंडित, मराठा समाजाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील, डॉ.योगेश क्षीरसागर, गंगाधर घुमरे, अरुण डाके, जगदीश काळे, विलास बडगे, गणपत डोईफोडे, अ‍ॅड.राजेंद्र राऊत, राजेंद्र मस्के, कुंडलिक खांडे, गंगाधर काळकुटे, परमेश्‍वर सातपुते, ज्ञानदेव काशिद, ऋषिकेश बेदरे, हरिदास जोगदंड, सखाराम मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, धर्मनाथ बीजेला यावर्षी 75 वर्षे पूर्ण होत असून याची सुरुवात वै.किसन बाबा यांनी केलेली आहे. त्यानिमित्त गोरक्षनाथ गडावर प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. म्हणून वै.किसन बाबा यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली असून ह.भ.प.शांतीब्रह्म नवनाथबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली या तीर्थक्षेत्राची महती आणि महत्त्व वाढू लागले आहे. पवित्र ती भूमी पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती याप्रमाणे या पुण्यभूमीत वै.किसनबाबा आणि नवनाथबाबा यांच्या पुण्याईने दिवसेंदिवस या ठिकाणचे महत्त्व आणि महात्म्य वाढू लागले असून लाखो भाविकांची उपस्थिती हेच एक उदाहरण आहे. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून इथे लाखो भाविक येऊ लागले आहेत. मनोभावे सेवा करणार्‍या भक्ताला गोरक्षनाथाचा आशीर्वाद मिळतो. जात-पात बाजूला काढून वारकरी सांप्रदायाने हा समाज एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला असून महाराष्ट्राची संस्कृती जतन करण्याचे काम प्रत्येकाने करायला हवे. गोरक्षनाथ टेकडीचा विकास सर्वांच्या सहकार्याने झाला असून यामध्ये आपण खारीचा वाटा उचलल्याचे समाधान होत आहे. यावेळी ह.भ.प.अक्रूर महाराज यांनीही माजी मंत्री क्षीरसागर यांनी गोरक्षनाथगडावर केलेल्या योगदानाचा उल्लेख करत धार्मिक क्षेत्रात जयदत्त अण्णांवर प्रेम करणारी मंडळी खूप आहे. कारण बीड जिल्ह्यातील अनेक धार्मिक क्षेत्राला त्यांचे सहकार्य असते असे ते म्हणाले. यावेळी शिवाजीराव फड, अ‍ॅड.विष्णूपंत काळे, गोरख दन्ने, नारायण माने, अरुण लांडे, संदीप डावकर, बालाप्रसाद जाजू, तुषार घुमरे, राजाभाऊ घुमरे, भाऊ सुरवसे, उद्धव म्हेत्रे, नारायण देवकते, ओमप्रकाश खवतड, बंडू घुमरे, भगीरथ बांडे, नवनाथ घोडके, बंडू लांडे, राम भोगे, नागेश शिंदे यांच्यासह परिसरातील भाविक-भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर घुमरे यांनी केले.

Back to top button