बीड

नवगण राजुरी येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नवगण राजुरी येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नवगण राजुरी दि.25(प्रतिनिधी)ः- येथे वै.ह.भ.प.रामबाबा खांबेकर यांच्या संकल्पनेतुन साकार झालेला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त दि.26 फेब्रुवारी ते दि.05 मार्च या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात दैनिक कार्यक्रमात पहाटे 4 तेे 6 काकडा भजन, सकाळी 7 ते 10 गाथापारायण, 10 ते 12 संत तुकाराम महाराज गाथा भजन, दुपारी 2 ते 4 संत तुकाराम महाराज चरित्र, सायंकाळी 4 ते 5 ज्ञानेश्‍वरी प्रवचन, 5 ते 6 हरिपाठ, रात्री 9 ते 11 हरिकिर्तन होणार असून यात ह.भ.प.नामदेव महाराज बहिर, वचिष्ठ महाराज गवते, दिपक महाराज जोशी, रामानंद महाराज पुरी, रावसाहेब महाराज शेळके, प्रा.प्रशांत पवळ, ह.भ.प.विठ्ठल महाराज बहिर यांचे प्रवचन तर ह.भ.प.गुरूवर्य महंत शिवाजी महाराज, श्रीक्षेत्र संस्थान नारायणगड, अंगद महाराज काशिद, हरी महाराज गवते, महंत रामानंद महाराज भारती, दत्ता महाराज सोळंके, अक्षय महाराज पिंगळे, श्रीरंग महाराज डोंगरे यांचे हरीकिर्तन होणार आहे. या सप्ताहाची सांगता गुरूवार दि.5 मार्च रोजी सकाळी भव्य दिव्य नगरप्रदर्षणा होईल, त्यानंतर 10 ते 12 या वेळेत ह.भ.प.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांचे संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त काल्याचे किर्तनाने होईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. तरी या अखंड हरीनाम सप्ताहाचा भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जगदगुरू संत तुकाराम महाराज बहिर मंडळ, नवगण राजुरी यांनी केले आहे.

Back to top button