महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर !

 

मुंबई | राज्यातील विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १० डिसेंबर रोजी या सहा जागांसाठी मतदान होणार असून, १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीअनमुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येणार आहेत.

विधानपरिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२२ रोजी जरी संपत असला, तरी सहा जागांसाठीच निवडणूक होत आहे. ज्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यामध्ये शिवसेनेची रामदास कदम यांची मुंबईतील जागा, काँग्रेसची भाई जगताप यांची मुंबईतील जागा आणि सतेज पाटील यांची कोल्हापूरमधील जागेचा समावेश आहे.

तसेच भाजपची धुळे-नंदुरबार येथील अमरीश पटेल यांची जागा व नागपूर मधील गिरीश व्यास यांची जागा याचबरोबर शिवसेनेची अकोला-बुढाणा-वाशीम येथील गोपीकिशन बाजोरिया यांच्या जागेचा समावेश आहे. तर, सोलापूर व अहमदनगर येथील जागेसाठी निवडणूक होणार नाही.

Back to top button