बीड

बीड जिल्हा संगणक टंकलेखन व लघुलेखन संघटनेची बैठक संपन्न

बीड जिल्हा संगणक टंकलेखन व लघुलेखन संघटनेची बैठक संपन्न

बीड, दि. 12 फेब्रुवारी २०२६ — बीड जिल्हा संगणक टंकलेखन व लघुलेखन संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संघटनेच्या जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला राज्य संघटनेचे अध्यक्ष मा. प्रकाश कराळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष आदरणीय श्री. सुभाष नाईकवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष श्री. अरुण नाळपे, सचिव भागवत ढाकणे व कोषाध्यक्ष रामदास खटाणे यांच्या नियोजित समितीने मार्गदर्शन केले.
बैठकीत संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे पाठपुरावा करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. तसेच परीक्षा शुल्कात झालेली वाढ, वाढती महागाई, दुकान भाडे व वीज बिलातील वाढ या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०२६ पासून संगणक टंकलेखन व लघुलेखन या शैक्षणिक प्रमाणपत्रासाठी प्रति विषय रुपये ६६०० इतके शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी विद्यार्थ्यांसाठी एलएमएस सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल बैठकीत त्यांचे अभिनंदन करून अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. या सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थ्यांना टंकलेखन व लघुलेखनाचे कौशल्य अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
तसेच संगणक टंकलेखन व लघुलेखनच्या विविध भरती प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त होतकरू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस नितीन बागलाणे, अशोक गायकवाड, गीते सर, संदीप लाड, सचिन पंडित, बालासाहेब घोडके, रवी नाईकवाडे, विजय चिंचोलकर, संदीप वारे, विनोद थोरात, भिसे, प्रा. संजय इंगोले आदी सदस्य उपस्थित होते.

Back to top button