बीड
श्री दत्त संस्थान बालाघाट येथे महाशिवरात्र उत्सव उत्साहात साजरा होणार

बीड प्रतिनिधी :
श्री दत्त संस्थान बालाघाट, कपिलधारवाडी (मांजरसुंबा) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. प.पु.ष.ब्र. श्री 108 शिवानंद शिवाचार्य महाराज (तमलुरकर) यांच्या कृपाशीर्वादाने तसेच दत्त उपासक श्री वैजिनाथ महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवार, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्र हा भगवान श्री शंकराचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी पहाटे लवकर भगवान श्री शंकरांना विधीवत महारुद्र अभिषेक करण्यात येणार असून, वेदमंत्रांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जाणार आहे. त्यानंतर महाआरती संपन्न होईल. भाविक भक्तांना अभिषेक व आरतीचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावर्षी विशेष आकर्षण म्हणून संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकार उपस्थित राहणार आहेत. बालाघाट डोंगर परिसरात होणारा हा कार्यक्रम भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरणार आहे.
तसेच महाशिवरात्र पूर्वकाळात विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात येत असून, दिवसभरात महारुद्र अभिषेक, महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील तसेच बाहेरील भागातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
या पवित्र महाशिवरात्र उत्सवाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन दत्त उपासक श्री वैजिनाथ महाराज शिंदे यांनी केले आहे.