मंगळवारी गुजर समाज देवसेनेची महत्वपूर्ण बैठक
बीड (प्रतिनिधी)-दि.20 मे 2025 मंगळवार रोजी जिल्ह्यातील गुजर समाज देवसेनेची विविध विषयावर प्रश्नांसाठी महत्वपुर्ण बैठक पंढरी कॉम्प्लेक्स, धानोरा रोड, बीड येथे आयोजित करण्यात आली आहे या ठिकाणी तालुका जिल्हा पदाधिकारी निवडण्याची प्रक्रिया देखील होणार आहे तरी ज्यांची इच्छा असेल त्यांनी संपर्क साधून चर्चा करावी आणि सदरील बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन गुजर समाज देवसेनेचे जिल्हाध्यक्ष रतन गुजर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील गुजर, जिल्हा संघटक अरुण नाना खटाणे, जिल्हा सचिव विनायक गुजर, जिल्हा कोषाध्यक्ष गजानन बहिरवाळ, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र गुजर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक घुशीर, शिरूर तालुकाप्रमुख शहादेव डोंगर, तुकाराम डोंगर, बाळू डोंगर यांच्या वतीने करण्यात आले आहे
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, गुजर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच समाज बांधव-भगिनींसाठी, समाजातील छोट्या-मोठ्या अडचणी सोडवण्यासाठी या बैठकीच्या माध्यमातून पदाधिकार्यांची बांधणी करावयाची आहे. आपल्या संघटनेतला माणूस आपापल्या सोयीनुसार कोणत्याही पक्षाचे काम करू शकतो त्याला बंधन नाही आपण फक्त समाज म्हणून समाजाच्या अडीअडचणीसाठी एकत्र येऊन समस्या सोडवण्याचे हेच एक उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर आहे. तसेच आपल्या समाजाचे अनेक कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांना राजकीय लोकांचा त्रास होत आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल हेही विचार करणे आवश्यक आहे गुजर समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी आपण समजून घेऊ शकतो का याच्यावर विचार मंथन करणे गरजेचे आहे ही संघटना आपल्या समाजाला न्याय देण्याचे प्रयत्न करेल असे आयोजकांनी सांगितले तसेच ज्यांना काही कारणाने बैठकीला येणे शक्य होणार नाही त्यांनी देखील जिल्हाध्यक्ष यांच्या 9420657997 या क्रमांकावर आपले म्हणणे मांडावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.