पहलगाम हल्ल्यावर संतापाचा उद्रेक ; जामखेडकरांचा निषेध मोर्चा

पहलगाम हल्ल्यावर संतापाचा उद्रेक ; जामखेडकरांचा निषेध मोर्चा
जामखेडमधून केंद्र सरकारकडे कठोर कारवाईची मागणी
जामखेड | प्रतिनिधी:-“निष्पाप पर्यटकांना केवळ हिंदू असल्यामुळे मारलं जातंय… हे फक्त दहशतवाद नाही, तर मानवतेवरचा काळा डाग आहे! अशा शब्दांत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाज, विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जामखेड येथे निषेध केला.
शहरातील जुने बसस्थानक, खर्डा चौक, जयहिंद चौक ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोषणा देत निषेध नोंदवला. तसेच तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील, डॉ.एकनाथ मुंढे, विवेक कुलकर्णी,जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले,अजय काशिद,पोपट राळेभात,संजय काशिद, उमेश कुलकर्णी, नगरसेवक अमित जाधव,पवन राळेभात,अशोक मुळे,दिगांबर राळेभात,मोहन गडदे, उद्योजक आकाश बाफना,जगदीश देशपांडे, गणेश मासाळ, विकास मासाळ, गणेश लटके,रंगनाथ राजगुरू,संभाजी मुळे,कल्याण हुलगुंडे, राजु भांबे,अमोल निमोणकर,योगेश औचरे,सुरज पवार,बिट्टू मोरे,कृष्णा बुरांडे,प्रविण होळकर, रणजित सुराणा,तुषार बोथरा, ज्ञानेश्वर कुलथे आदी विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रा.मधुकर राळेभात, डॉ . एकनाथ मुंढे,अजय काशिद, आकाश बाफना, संजय काशिद,पवन राळेभात, विवेक कुलकर्णी आदींनी निषेध व्यक्त केला.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. “आता फक्त निषेध नव्हे, तर ठोस पावलं उचलायची वेळ आली आहे,या अमानवी हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. हल्ल्यातील जखमींच्या उपचारासाठी तातडीची सरकारी मदत मिळावी आणि अशा हल्ल्यांना कायमचा आळा बसावा, यासाठी जनतेने एकत्र यावं, असं आवाहन करण्यात आलं.



