जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित ५८ ग्रामपंचायतींसाठी चिठ्ठीद्वारे सोडत ; महिलांचे आरक्षण आज ठरणार

जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित
५८ ग्रामपंचायतींसाठी चिठ्ठीद्वारे सोडत ; महिलांचे आरक्षण आज ठरणार
जामखेड प्रतिनिधी:-जामखेड तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण बुधवारी (ता. २३) तहसील कार्यालयात चिठ्ठीद्वारे सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंचपदांचे आरक्षण निश्चित झाले असून महिलांसाठीचे आरक्षण गुरुवारी (ता. २४) कर्जत येथे होणार आहे.
या प्रक्रियेस तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महिलांचे आरक्षण उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निश्चित होणार आहे.
आरक्षणाची तपशीलवार यादी :
*lअनुसूचित जाती (SC) : शिऊर, दिघोळ, पाटोदा, साकत, वाघा, जातेगाव
अनुसूचित जमाती (ST) : पिंपरखेड
इतर मागास प्रवर्ग (VJNT/OBC) :
अरणगाव, आनंदवाडी, जवळा, झिक्री, धनेगाव, कवडगाव, पिंपळगाव आळवा, मतेवाडी, बोर्ले, वाकी, सातेफळ, सारोळा, तेलंगशी, पाडळी, डोणगाव, देवदैठण
सर्वसाधारण (Open) :
मोहरी, आघी, घोडेगाव, पिंपळगाव उंडा, नायगाव, खुरदैठण, नान्नज, सोनेगाव, फक्राबाद, जवळके, धोंडपारगाव, मोहा, हाळगाव, बांधखडक, राजुरी, नाहुली, धामणगाव, धानोरा, खर्डा, रत्नापूर, सावरगाव, खांडवी, बाळगव्हाण, आपटी, तरडगाव, कुसडगाव, राजेवाडी, चोभेवाडी, गुरेवाडी, जायभायवाडी, मुंजेवाडी, पोलेवाडी, बावी, लोणी



