बीड

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी दत्तात्रय नरनाळे

 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी दत्तात्रय नरनाळे

बीड (प्रतिनिधी):- अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य हे देशभर चालू असून पत्रकारांच्या प्रश्नावर आवाज उठवणारी आणि न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असून या संघटनेच्या बीड जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मराठवाडा पत्र चे संपादक दत्तात्रय नरनाळे यांची संस्थापक अध्यक्ष मनोहरजी सुने साहेब प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख मराठवाडा अध्यक्ष जगदीश बुलबुले, मराठवाडा उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांच्या सूचनेवरून बीड जिल्हाध्यक्ष अशोक होळकर यांनी ही निवड केली  आहे .

पत्रकारांच्या प्रश्नावर आवाज उठवणारी ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना देशभर कार्यरत असून दिवसेंदिवस या संघटनेची व्याप्ती वाढत असून बीड जिल्ह्यात देखील या संघटनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष अशोक होळकर हे पत्रकारांच्या प्रश्नावर आवाज उठवत आहेत ,संघटनेची मजबूत बांधणी करण्यास सुरुवात झाली असून नुकतीच जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दैनिक मराठवाडा पत्र चे संपादक दत्तात्रय नरनाळे यांच्यावर देण्यात आली असून वरिष्ठांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अशोक होळकर व मराठवाडा उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .

 
Back to top button