बीड

१२ जुलै रोजी संभाजीनगर येथे होणाऱ्या सकल गोर बंजारा एस.टी. आरक्षण महामेळाव्यात सहभागी व्हा – विजय पवार

१२ जुलै रोजी संभाजीनगर येथे होणाऱ्या सकल गोर बंजारा एस.टी. आरक्षण महामेळाव्यात सहभागी व्हा – विजय पवार

तुम देखोगे आखो से , हम आयेंगे लाखों से…अभी नहीं,तो कभी नहीं

गोर बंजारा समाज हा आदीम सभ्यता रानावनात भटकंती करणारा समाज असून इस १८७१ नंतर जमाती म्हणून ब्रिटीश दरबारी नोंद असलेला तसेच हैदराबाद गॅझेट मध्ये आदीम असलेला समाज म्हणूनही शासकीय नोंद आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर समाजाला कुठे एस.टी, कुठे एस.सी., कुठे व्हि.जे.एन.टी कुठे ओ.बी. सी. अशा वेगवेगळ्या संवर्गाचे आरक्षण देऊन शासनकर्त्या लोकांनी तुकडे तुकडे केले. एकच बोलीभाषा, एकच पेहराव, एकच धाटी, वहीवार संस्कृती जोपासणारा हा समाज
लोकूर समीतीने आदीवासी
सदस्यांच्या पाचही वैशिष्टये पूर्ण करतात मात्र स्वातंत्र्या पासुन तर आजपर्यंत विविध आयोग गठीत करण्यात आले मात्र एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण मात्र मिळले नाही. २०२५ मध्ये गोरबंजारा समाजाने या मागणी साठी संपुर्ण महाराष्ट्रात ५५ पेक्षा अधिक लाखोच्या संख्येने महामोर्चा काडण्यात आले २०११ पासुन गोर सेना व इतर सामाजिक संघटनानी या बाबतीत राज्यभर धरने, उपोषण, मोर्चा, आंदोलने केलेली असून अनेकांनी आमरण उपोषण केले आहे. बंजारा समाजातील पाच युवकांनी या मागनीसाठी प्राणाची आहुती दिली आहे. ३०/१०/२०२५

रोजी गोर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी हजारो गोर सैनिक घेऊन समृद्धी महामार्ग रोखला नांदेड येथे रेल्वे रोकोची हाक दिली तेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी रेल्वे रोको स्थगित करा, आपल्या मागण्यासाठी चर्चा करण्यास तयार आहे असे सांगून दि.४ डिसेंबर २०२५ रोजी मंत्रालयात गोर बंजारा प्रतिनिधी व प्रशासन यांच्यात चर्चा होऊन त्या तहलियांनी यांच्या अध्यक्षते खाली एस. टी. आरक्षण अभ्यास समिती नेमण्यात येवून तिन महिन्याच्या आत समिती कार्यान्वित करण्याचे सांगीतले होते मात्र पाच महीने उलटुनही सदर आयोगानी कोणतेही अहवाल सादर तर केलेच नाही म्हणून ०७ मे २०२६ रोजी त्या तहलयानी आयोगाचा अहवाल सादर करा अशाप्रकारची मागणी गोर सेनेने ३०० ठिकाणी निवेदन देवून शासनाला धारेवर धरले तेव्हा कुठे एक जि.आर. काढुन तहलियानी समितीस प्रवास
भत्ता, मानधन, अभ्यासासाठी लागणाऱ्या सेवा सवलती पूरविण्याचे जाहीर केले तर हे कागदोपत्री घोडे नाचवण्याचे काम करून शासन प्रशासन फक्त गोरबंजारा समाजाची दिशाभूल केली आहे.

यासाठी पुढील आंदोलनाची रणनिती ठरविण्यासाठी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात संभाजीनगर येथे दि.१२ जुलै २०२६ रविवार रोजी सकल गोर बंजारा एस.टी. आरक्षण महामेळावा आयोजीत करण्यात आले असून या मेळाव्याला लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मा.विजय भाऊ पवार गोर सेना जिल्हाध्यक्ष, पुणे यांनी केले आहे.

Back to top button