पृथ्वीराज गिरीने राजस्थान येथे झालेल्या शालेय नेट बॉलच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक पटकावले

पृथ्वीराज गिरीने राजस्थान येथे झालेल्या शालेय नेट बॉलच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक पटकावले
बीड (प्रतिनिधी):- नुकत्याच राजस्थान येथे नीट बॉलच्या सतरा वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाल्या. या राष्ट्रीय स्पर्धा स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया व राजस्थान क्रीडा विभाग यांच्या वतीने घेण्यात आल्या होत्या. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये एकूण 26 राज्याच्या संघाने सहभाग नोंदवला. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळत असताना महाराष्ट्र संघासाठी अत्यंत उत्कृष्ट प्रदर्शन करत मोलाची कामगिरी बजावली राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाला तृतीय पारितोषिक मिळवण्यात यश आले.
पृथ्वीराज गिरी हा मागील तीन वर्षापासून जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदानावर नेट बॉलचा सराव करत आहे. त्याला प्रशिक्षक रोहित ढवळे, अमोल ढवळे, संकेत वायकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, शारीरिक शिक्षण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनायक वझे, क्रीडा अधिकारी रेवणनाथ शेलार, अनिकेत काळे, अविनाश पाटील, होसुरकर सर, क्रीडा मार्गदर्शक सतीश राठोड, बीड जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गिरी, हरिश्चंद्र गिरी, सचिव रामदास गिरी, नेट बॉलचे जिल्हा प्रशिक्षक विशाल गिरी, माऊली ढवळे, उत्तरेश्वर सपाटे यांनी खेळाडूंचा सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.



