शेवगांव शहरातील विविध ज्वलंत समस्यांवर चर्चा करण्यासाठी नुकतीच सर्वपक्षीय कृती समितीची बैठक संपन्न

शेवगांव शहरातील विविध ज्वलंत समस्यांवर चर्चा करण्यासाठी नुकतीच सर्वपक्षीय कृती समितीची बैठक संपन्न
अहिल्या नगर:-शेवगांव शहरातील ज्वलंत सध्याचा पाणी प्रश्न [ रखडलेली नवीन पाणी योजना ] अतिक्रमण हटाव मोहीमे नंतर निर्माण झालेले टपरीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न या संधर्भात चर्चा करण्यासाठी महात्मा सार्वजनिक वाचनालय येथे सर्व प्रमुख पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली त्यात नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी शहरातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याची भावना विद्यमान लोकप्रतिनिधींचे शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष यावर चर्चा करण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलनाची भूमिका घेण्याची या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते प्रेमसुख जाजू
भा.ज.पा. चे अरुण मुंढे माजी सभापती अरुण पाटील लांडे वंचित चे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण कॉम्रेड संजय नांगरे तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख भा.ज.प.चे अशोक शेठ आहुजा, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, माजी नगरसेवक कमलेश गांधी,निलेश लंके प्रतिष्ठान चे बंडुशेठ उर्फ सुनिल रासने माजी नगरसेवक विकास फलके, दिगंबर काथवटे ,संदिप म्हस्के, शिवसेनेचे एकनाथ कुसळकर, भाजपचे अमोल सागडे,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष विजय देशमुख अजय भारस्कर, श्याम कनगरे , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे कैलास तिजोर सम्राट अशोकनगर चे अध्यक्ष राहुल सावंत नितीन फुंदे सामाजिक कार्यकर्ते विक्रांत लांडे, तुषार लांडे सुरेश लांडे काँग्रेस आय चे समीर काझी आसिफ काझी माजी नगरसेवक उमर शेख दत्तात्रय आरे टपरीधारक संघटनेचे बंडुशेठ मेहेर बाळासाहेब डाके भाऊसाहेब कोल्हे सनी देशमुख राजु इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
शेवगांव शहरातील अंतर्गत पाईपलाईन नवीन जलकुंभ आणि वितरण व्यवस्था यांची माहिती राजकारणी नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांना अधिकाऱ्यांनी सविस्तर समजून सांगितले पाहि जे विद्यमान आमदार आणि खासदार यांचे शेवगांव तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे स्थानिक लोकप्रतिनिधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सुचनांची अधिकारी दखल घेत नाहीत आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन किमान सामान कार्यक्रमावर एकत्र येऊन पालकमंत्री महोदयांना निवेदन देणे अथवा रास्ता रोको किंवा धरणे आंदोलन करणे या बाबत निर्णय घेण्याचे शेवगांव शहर कृती समिती च्या बैठकीत ठरले
चौकानात
या मिटिंग मध्ये शहरातील सत्ताधारी शिवसेना गट विद्यमान आमदार गट व माजी खासदार सुजय विखे गट यांच्या कार्यकर्त्यांची अनुपस्थिती जाणवत होती


