बीड

जामखेड च्या साक्षी पवार हिचे बुद्धीबळ स्पर्धेत यश आदिवासी समाजाच्या लेकीचा पराक्रम!

जामखेड च्या साक्षी पवार हिचे बुद्धीबळ स्पर्धेत यश आदिवासी समाजाच्या लेकीचा पराक्रम!

जामखेड प्रतिनिधी

डॉ. डी. वाय. पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर पिंपरी चिंचवड पुणे येथे वैद्यकीय (BHMS) अभ्यासक्रम शिकणाऱ्या साक्षी लक्ष्मी किशोर पवार यांनी महाविद्यालयीन स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.या बुद्धिबळ स्पर्धेत महिलांमध्ये विजेतेपद पटकावले आहे.बुद्धिबळासारख्या मानसिक कौशल्याच्या खेळात त्यांना बालपणापासूनच आवड होती.
जामखेड येथील जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार या साक्षी पवार यांच्या मातोश्री आहेत. समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या एक धाडसी स्त्री आहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलींना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी लक्ष्मी ताई पवार या मोठ्या कष्टाने व जिद्द मनात ठेवून शिक्षणासाठी पुण्यात पाठवले आहे. तसेच मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहून वंचित घटकातील लोकांना आरोग्य सेवा देता येईल या हेतूने शिक्षण चालू आहे.साक्षी पवार या आदिवासी पारधी समाजातील असून त्या मोठ्या जिद्दीने शिक्षण घेत आहे. बुध्दीबळ स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल साक्षी पवार हिचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.सुवर्णपदक जिंकल्यानंतर साक्षीने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “ही केवळ माझीच नाही, तर माझ्या आईच्या संघर्षाची आणि आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाची जिंकलेली बाजी आहे. हे सुवर्णपदक मी माझ्या समाजाला आणि माझ्या आईला अर्पण करते.”

*प्रतिक्रिया*
” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा विचार करता आई – वडीलांचे स्वप्न पूर्ण कसे करता येईल.“मुलीने शिकले पाहिजे, स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, हे माझे स्वप्न आहे” या प्रेरणेमुळेच साक्षीने मेहनत घेतली आणि बुद्धिबळात आपले कौशल्य सिद्ध करून सुवर्णपदक पटकावले. साक्षी यांनी हे यश मिळवत केवळ स्वतःचे नव्हे, तर संपूर्ण आदिवासी समाजाचे नाव उज्वल केले आहे. या यशामुळे अनेक आदिवासी मुलींना प्रेरणा मिळेल आणि त्या देखील आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करतील.विद्यार्थ्यांनी यासाठी मोठ्या जिद्दीने यश संपादन करावे.

*लक्ष्मीताई पवार*
साक्षी पवार यांच्या मातोश्री

Back to top button