बीड

गायरान जमिनी नांवे करण्यासाठी महाधरणे आंदोलनात सामील व्हा  – पप्पू वाघमारे

गायरान जमिनी नांवे करण्यासाठी महाधरणे आंदोलनात सामील व्हा  – पप्पू वाघमारे
बीड (प्रतिनिधी )अनेक वर्षांपासून कसत
असलेल्या व नविन अतिक्रमणित गायरान जमिनीच्या प्रलंबित प्रकरणे नियमाकुल करुन गायरान धारकांच्या नावे करण्यासाठी महाधरणे आंदोलनाचे आयोजक युवा रिपाई प्रदेशाध्यक्ष तसेच रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पुजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा रिपाइंच्या वतीने विराट महाधरणे आंदोलन खालील मागण्यांची शासन
दरबारी पूर्तता करून घेण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे.
१९९० शासन परिपत्रक (शासन जी.आर) नुसार गायरान जमिनीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावीत. भूमिहीन गायरान धारक शेतमजूर व उसतोड कामगार यांना प्रतिमहिना ३००० रुपये पेन्शन (अनुदान) देण्यात यावे. गायरान धारकांच्या ७/१२ व ८-अ उताऱ्यावर असणाऱ्या पोट खराब क्षेत्र काढण्यात यावे. आदी प्रमुख मागण्याचे शासन स्तरावर पूर्तता    करण्यासाठी मंगळवार दि.२३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाइंच्या वतीने करण्यात येणाऱ्या महाधरणे आंदोलनात गायरान धारकांसह शहरातील रिपाइं पक्षाधिकारी, महिला व कार्यकर्ते यांच्यासह घरकुल धारक यांनी हजारोच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन रिपाई  शहर सचिव पप्पू वाघमारे यांनी केले आहे

Back to top button