बीड
तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी दोन जणां विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी दोन जणां विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील लव्हुरी येथील तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की कृष्णा जालिंदर चाळक वय ३० वर्षे रा.लव्हुरी ता.केज हे दिनांक ११ ऑक्टोंबर २०२६ रोजी रात्री ९-३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वडिला सोबत त्यांच्या घरासमोर असताना कृष्णा चाळक यांच्या गावातील मुकादम अशोक बळीराम चाळक, पांडुरंग अशोक चाळक हे त्या ठिकाणी येऊन कृष्णा चाळक यांच्या वडिलांना म्हणाले तुझा मुलगा अशोक याने आमच्याकडून एक लाख रुपये घेतले ते आम्हाला परत द्या नाहीतर तुम्हाला पैसे देणं होत नसेल तर तुमच्या मुलाच्या नावावर असलेली शेती आमच्या नावावर करून द्या. त्यावेळी कृष्णा चाळक म्हणले की, आमच्याकडे पैसे नाहीत. अशोक ने तुमच्याकडून पैसे घेतले आहेत तर त्याला घेऊन जा आणि पैसे त्याच्याकडूनच घ्या आम्हाला पैसे मागण्याचा तुमचा काही संबंध नाही असे कृष्णा चाळक म्हणाले असता दोघांनी मिळून त्यांना लाथा बुक्क्याने, सापटाने मारहाण करून अशोक बळीराम चाळक यांनी हातात दगड घेऊन डाव्या बाजूला डोळ्याच्या वर डोक्यात मारून जखमी केले व पांडुरंग अशोक चाळक यांनी हातात बांबू घेऊन डोक्यात मध्यभागी व पाठीवर, अंगावर मारून मुक्कामार दिला. त्यांची भांडण चालू असताना कृष्णा चाळक यांच्या आई लक्ष्मी चाळक व विशाल शिवाजी चाळक, जयराम सुभाष मोहिते यांनी भांडणाची सोडवा सोडव केली. कृष्णा चाळक यांच्या डोक्यात मार लागला असल्याने ते पोलीस ठाणे येथे गेले असता केज पोलिसांनी त्यांना उपचार कामी उपजिल्हा रुग्णालय केज येथे पत्र देऊन पाठवले होते. दिनांक १२ ऑक्टोंबर २०२६ रोजी कृष्णा जालिंदर चाळक हे उपचार घेऊन केज पोलीस ठाणे येथे हजर होऊन त्यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं.६४६/२०२६ कलम ११५(२),११८(१),२(५),३५२ भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ नुसार अशोक बळीराम चाळक, पांडुरंग अशोक चाळक रा.लव्हुरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोह/पल्लवी तरकसे या करीत आहेत.



