📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

दुष्काळी परिस्थित टॅकर प्रणालीत पार्दशकता आसावी – सौ.गिताभाभी पवार 

दुष्काळी परिस्थित टॅकर प्रणालीत पार्दशकता आसावी – सौ.गिताभाभी पवार
गेवराई शहराच्या
विकास कामासाठी तातडीने निधी द्या  – नगराध्यक्षा गीताभाभी पवार
 नगर परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
गेवराई  (सूर्योदय न्यूज)- दुष्काळी परिस्थिती मध्ये पाणी टॅकर प्रणालीत पार्दशकता आणण्यासाठी जि.पी.एस. व क्युआर कोड प्रणाली बंधनकारक करण्यात यावी तसेच टँकर भरतात त्या ठिकाणी सिसिटिव्ही कॅमेरा बसवण्यात यावा तसेच पि.आर.कार्ड वाटपाच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्षा सौ.गिताभाभी पवार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी निवेदनाद्वारे मागणी
    दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांच्या निमित्ताने नगर परिषदेच्या अध्यक्षा गीताभाभी बाळराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली नपचे सर्व सभापती, नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मंगळवार ता. १३ रोजी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन, विविध प्रश्नांवर चर्चा करून, सविस्तर निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, नपच्या निवेदनाचा विचार करून, सर्व विषयातील विभागांना तातडीने निधी देण्यात येईल, अशी सकारात्मक भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली आहे.
   जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
शहराच्या विकासाच्या दृष्टीने नगर परिषद विविध विकासकामे व नागरी सुविधा उपलब्ध करून देत आहे. शहराची वाढती लोकसंख्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा व इतर मूलभूत गरजा लक्षात घेता नगर परिषदेस आवश्यक निधी गरजेचा आहे.  बीड जिल्हा वार्षिक योजनेचा सन २०२६-२७ अंतर्गत नगर परिषदेस आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येऊन, विकासकामांच्या प्रस्तावांना तातडीने प्रशासकीय मान्यतात द्यावी, शहरातील स्वच्छता व्यवस्था सक्षम व प्रभावी करण्यासाठी स्वच्छता विभागामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. या कामांना आवश्यक मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावा, २०२३-२०२४ मध्ये नगर परिषदेमार्फत पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात आलेल्या टँकरच्या बिलांची रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही, सदरील प्रलंबित बिलांची रक्कम उपलब्ध करून देण्यात यावी.
नगर परिषदेमार्फत शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीसाठा मर्यादित असल्याने क्षमतेपेक्षा जास्त टँकर ग्रामीण भागासाठी उपलब्ध करून दिल्यास शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन पाणीटंचाईस सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे, ग्रामीण भागासाठी टँकर उपलब्ध करून देताना नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी करावी.
टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना पारदर्शकता राहावी व गैरव्यवहारास आळा बसावा यासाठी सर्व अधिकृत टँकरवर GPS ट्रॅकिंग व QR कोड प्रणाली बंधनकारक करण्यात यावी, पाणी  केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. नागरिकांच्या मालमत्तेच्या नोंदी अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने पी.आर.कार्ड  आवश्यक आहे. गेवराई शहरातील  मिळकतींचे तात्काळ सर्वेक्षण करून मोजणी व भूमिअभिलेखाची कार्यवाही पूर्ण करावी व पी.आर.कार्ड तयार करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी उपाध्यक्ष रेवती भगवान घुंबार्डे, गट नेते राजेंद्र राक्षसभूवनकर, नपचे सर्व विभागाचे सभापती, नगरसेविका नगरसेवक उपस्थित होते.
Back to top button