पाटोदा (ग) येथे गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पाटोदा (ग) येथे गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जामखेड प्रतिनिधी – सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात सदैव अग्रेसर राहिलेले सामाजिक कार्यकर्ते तथा पाटोदा गरडाचे येथील माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
सालाबादप्रमाणे याही वर्षी १५ ऑगस्ट रोजी पाटोदा गरडाचे येथे दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कु. ज्ञानेश्वरी दिनकर टापरे हिने मिळवले, तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक कु. चैत्राली बाळासाहेब जोनगहू व कु. पूजा अंबादास टापरे यांनी पटकावले. विद्यार्थ्यांचा गौरव रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच पेन व पुस्तके देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थित पालकांचा देखील माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांमध्ये दिनकर टापरे, मुकुंद कडू, केदार वाबळे, हनुमान देशमुख, जमीर पठाण, बंडू कडू, शिक्षक खंडागळे सर, अनारसे मॅडम, शेख सर, मार्कंडे सर, हत्ते मॅडम, चारणे सर, उंबरे सर, शिंदे सर, शिंदे यू.बी., देवकाते सर, वस्तारे सर, भैलुमे सर, जमदाडे सर, निंबाळकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमाला ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



