राजकीय

“आता सर्वच मंत्र्यांनी भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली”

 

मागच्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून महाविकास आघाडीच्या नेत्यावर घणाघाती आरोप केले जात असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर फक्त भाजपाला प्रतिउत्तर देण्याचा ठाकरे आणि पवार कुटुंबीयांनी ठेका घेतला आहे का? तसेच सत्तेत बसलेल्या इतर मंत्र्यांनी सुद्धा बोललेलं पाहिजे असे विधान संजय राऊत यांनी केले होते. आता त्या पाठोपाठ याच विषयाला धरून आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केले आहे. भाजपला सर्वच मंत्र्यांनी प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचं जाधव यांनी म्हंटल आहे.

भास्कर जाधव यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं असून आता विरोधकांच्या टीकेला सर्व मंत्र्यानी आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे. कारण केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी लागल्या आहेत. शिवाय केवळ मराठी अधिकाऱ्यांना सातत्याने टार्गेट केलं जातं आहे. धक्कादायक म्हणजे या होऊ घातलेल्या धाडी आणि त्यांच्या तारखा भाजपचे नेते आधी सांगत आहेत. त्यामुळे याचा अर्थ असा होता की यंत्रणा भाजपसाठी काम करत आहेत? असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरही प्रतिक्रिया दिली आहे. नांदेडला पोटनिवडणूक लागली आहे. त्याठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी ते काहीही करतील, असं त्यांनी म्हटलं आहे. २०१४ पूर्वीची भाजपची आंदोलनं पाहिली तर लक्षात येईल की हे डोक्यावर सिलेंडर घेऊन जायचे. त्यावेळी प्रत्येकवेळी म्हणायचे कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा. आता वेळ आली आहे म्हणायची ‘कुठे नेवून ठेवला आहे भारत माझा’, असा टोला त्यांनी लगावला.

Back to top button