राजकीय

उत्तर प्रदेश निवडणुकीत ४०% महिलांना काँग्रेस तिकीट देणार

 

उत्तरप्रदेश निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी उत्तरप्रदेशची जबाबदारी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. याच पार्श्वभूमीवर मागच्या काही महिन्यापासून त्या उत्तरप्रदेशच्या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत.

त्यातच आता येणाऱ्या उत्तरप्रदेश निवडणुकीला ४० % महिलांना तिकीट देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. गांधी म्हणाल्या की, येत्या उत्तर प्रदेश निवडणुकीत आम्ही 40% तिकिटे (उमेदवार) महिलांना देऊ. हा निर्णय त्या सर्व महिलांसाठी आहे ज्यांना उत्तर प्रदेशात बदल हवा आहे, राज्याची प्रगती हवी आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, महिला राजकारणात पूर्ण सहभागी होतील. जेव्हा २०१९ च्या निवडणुका आल्या तेव्हा अलाहाबाद विद्यापीठाच्या काही मुली भेटल्या होत्या, त्यांनी सांगितले होते की वसतिगृहातील मुला -मुलींसाठी कायदे वेगळे आहेत. हा निर्णय अशांसाठी आहे ज्यांनी मला गंगा यात्रेच्या वेळी सांगितले होते की, माझ्या गावात शाळा नाही. प्रयागराजच्या पारोसाठीही, जिने हात धरून म्हटले होते की मला नेता व्हायचे आहे, अशा सर्वांसाठी आहे असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Back to top button