बीड

लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी “शेतकरी सहवेदना दिवस :- डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी “शेतकरी सहवेदना दिवस :- डॉ.गणेश ढवळे
—-
लिंबागणेश:- ( दि.१९)  शेतकऱ्यांच्या आत्महत्या हि राष्ट्रीय आपत्ती असुन आत्महत्या रोखण्याचा कायमस्वरूपी उपाय म्हणून शेतकरी विरोधी सिलिंग, आवश्यक वस्तु, जमीन अधिग्रहण कायदे रद्द करण्यात यावेत या प्रमुख मागणीसह यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे,मालतीताई करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी आर्थिक विवंचनेतुन आपल्या ४ लहान मुलांसह सामुहिक आत्महत्या केली होती.या सामुहिक आत्महत्येची शासन दरबारी पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झाली.या घटनेला यावर्षी ३९ वर्षे पूर्ण झाली आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड पोलिसांच्या माहितीनुसार देशभरात दररोज सुमारे ४५ शेतकरी आत्महत्या करतात. तर महाराष्ट्रात दररोज सुमारे १५ शेतकरी आत्महत्या करून मृत्युला कवटाळतात. बीड जिल्ह्यात २०१४ ते २०२४ या १० वर्षाच्या कालावधीत २४३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे.
८ वर्षांपासून १९ मार्च २०१९ पासुन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यातील आणि देशातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी दरवर्षी १९ मार्च रोजी अन्नदात्यासाठी एक दिवस उपवास करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात प्रभावी संदेश देण्यासाठी शेतकरी आत्महत्या रोखण्याचा कायमस्वरूपी उपाय म्हणून शेतकरी विरोधी कायदे रद्द रद्द करण्यात यावेत.प्रशासनाच्या निष्क्रियतेला जाब विचारण्यासाठी, शेतकऱ्यांचे हक्क व अस्तित्व वाचवण्यासाठी एल्गार करण्याच्या उद्देशाने संवेदनशील नागरीकांनी एक दिवसाचा कडकडीत उपवास करत आपल्या सहवेदनेचा, पाठिंब्याचा आणि आंदोलनाच्या जाज्वल्य हेतुचा जागर करण्यासाठी अमर हबीब यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक उपवास, सामुहिक उपोषण, श्रद्धांजली सभा आदिंचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले असुन या आवाहनाला प्रतिसाद देत किसानपुत्र आंदोलक डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१९ बुधवार रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात सामुहिकरीत्या एक दिवस अन्नत्याग आंदोलन करत आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी ” शेतकरी सहवेदना दिवस” पाळण्यात आला. यावेळी आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात, महादेव कुदळे, अँड.गणेश वाणी, भगवान मोरे, रामकिसन गिरे, पांडुरंग वाणी, रामचंद्र मुळे,आश्रुबा गिरे, राजेंद्र वायभट, साहेबराव निर्मळ , महादेव ढास, संतोष भोसले, संजय सुकाळे , पत्रकार हरीओम क्षीरसागर आदी सहभागी झाले होते.

Back to top button