बीड
कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातुन संस्था उभी राहिली —-रणवीर पंडित

कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातुन संस्था उभी राहिली —-रणवीर पंडित
*जयभवानीत शिक्षक हरिभाऊ हकाळे यांचा सेवापुर्ती समारंभ*
गेवराई दि.२८ (प्रतिनिधी) माजीमंत्री आदरणीय दादांनी संस्थेचे रोप लावले, त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. या संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचाही बहुमोल वाटा आहे, त्यांच्या परिश्रमातुन संस्था उभी राहिली असे प्रतिपादन शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांनी केले. जयभवानी विद्यालयातील पर्यवेक्षक हरीभाऊ हकाळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
शिवाजीनगर गढी येथील जयभवानी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक हरिभाऊ हकाळे
हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. सोमवार दिनांक २८ जुलै रोजी त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित,
जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव शेळके, जगन्नाथ शिंदे, बाबुराव काकडे, कुमारराव ढाकणे, संदिपान दातखिळ, सरपंच विष्णुपंत घोंगडे, माजी गटशिक्षणाधिकारी अर्जुन गुंड, प्राचार्य लक्ष्मणराव इंगोले, संस्थेचे वरिष्ठ लेखा अधिकारी प्रतापराव हटोटे, माजी प्राचार्य डॉ.एस.डी. पटेल, मुख्याध्यापक वसंत राठोड यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हरिभाऊ हाकाळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना हरीभाऊ हाकाळे म्हणाले की, आदरणीय शिवाजीराव (दादा) पंडित यांच्यामुळे
माझ्या आयुष्याचे सोने झाले.शिवछत्र परिवाराचा कायम ॠणी राहील. यापुढील काळातही शिवछत्र परिवाराशी आम्ही कायम एकनिष्ठ राहू असेही ते यावेळी म्हणाले. यावेळ माजी गटशिक्षणाधिकारी अर्जुन गुंड, दिलीप धस, श्रीमती वराट यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य व्हि.पी. राठोड यांनी केले. सूत्रसंचालन रणजीत बडे यांनी करुन उपस्थितांचे आभार दिपक सकाळचे यांनी मानले कार्यक्रमाला हरीभाऊ सकाळचे यांच्या सौभाग्यवती अलका सकाळचे यांच्यासह मुलगा डॉ. तुषार सकाळचे, मुलगी सौ. ऐश्वर्या इंगोले, जगदिश इंगोले, आर. आर. जाधव राजेंद्र जगदाळे, बाळासाहेब पंडित, भगवान शेळके, रघुनाथ शेळके, अशोक शेळके, जगदिश इंगोले, दिलीप गवते, अर्जुन शेळके, नामदेव चव्हाण, ढेरे सर, बाळासाहेब पंडित, बाळासाहेब सानप, प्रमोद पंडित, धनंजय जोगदंड, कल्याण गवते गणेश हाकाळे, संदिपान हाकाळे बद्री धांडे, गणपत शेंबडे, महादेव धांडे मधुकर कापरे, भगवान शेळके, कल्याण शेळके, अशोक शेळके, अनिल धांडे प्रकाश डोंगरे,तात्यासाहेब शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मान्यवर उपस्थित होते.



