बीड

आदरणीय जयसिंग ( भाऊ ) पंडित – सचोटीचे ज्योतिर्मय व्यक्तिमत्व

आदरणीय जयसिंग ( भाऊ ) पंडित – सचोटीचे ज्योतिर्मय व्यक्तिमत्व

भारतीय संस्कृतीत शिक्षक दिन हा केवळ आदर व्यक्त करण्याचा दिवस नाही, तर तो ज्ञान, प्रामाणिकपणा, मार्गदर्शन आणि समाज उभारणीची जाणीव करून देतो. या दिवशी जन्माला आलेली व्यक्ती म्हणजे जणू शिक्षण, सेवा आणि जनकल्याण यांचा संगमच ठरते.याच दिवशी ज्यांचा जन्म झाला असे गेवराई तालुक्यातील एक व्यक्तिमत्व आज समाजासाठी प्रेरणेचा दीप बनले आहे ते म्हणजे जय भवानी व जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा शिव शारदा मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. जयसिंग ( भाऊ ) शिवाजीराव पंडित.
  आदरणीय जयसिंग भाऊंनी आजतागायत शिक्षण , सहकार , उद्योग , शेती या क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहून त्याचे व्यवस्थापन करत असताना त्यामध्ये सच्चेपणा, पारदर्शकता, समाजाभिमुख दुरदृष्टिकोन आणि सर्वसामान्यांचा सहभाग या मूल्यांना प्राधान्य दिले आहे.
शिक्षण क्षेत्रात जय भवानी व जगदंबा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे. ज्ञानदानाला सर्वश्रेष्ठ मानून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने ते नेहमी प्रयत्नशील असतात. आदरणीय जयसिंग भाऊंनी शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, सामाजिक विकास, सांस्कृतिक जतन, आर्थिक विकास, जागरूकता ही शिक्षणाची उद्दिष्ट साध्य करत ग्रामीण व शहरी भागातील असंख्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. व्यवस्थापनात शिस्त, गुणवत्तेला दिलेले महत्त्व तसेच शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांप्रती असलेली जबाबदारी यामुळे त्यांचे कार्य समाजात अनुकरणीय आहे. त्यांच्या या कार्यामुळे आज तालुक्यातील असंख्य विध्यार्थी जीवनात प्रगती करत आहेत.
तसेच सहकार क्षेत्रामध्ये शिव शारदा मल्टीस्टेट व भवानी को – ऑपरेटिव्ह बँक यांच्या माध्यमातून त्यांनी पारदर्शक धोरणे, योजनांची काटेकोर अंमलबजावणी आणि सर्वसामान्यांना वित्तीय सेवांचा सहज लाभ मिळवून देण्याची भूमिका पार पाडली आहे. त्यांनी बँकिंग क्षेत्रातून ग्रामीण भागाला आर्थिक पाठबळ दिले. शेतकरी, छोटे व्यावसायिक, महिला बचत गट यांना प्रामाणिक व सक्षम बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या. “ग्राहक हाच खरा देव” या भूमिकेतून त्यांनी ग्रामीण विकासाचे नवीन मार्ग खुले केले.
शेतकरी, व्यावसायिक व सर्वसाधारण ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या शिव शारदा मल्टीस्टेट व भवानी को-ऑपरेटिव्ह बँक ही त्यांच्या सचोटीपूर्ण नेतृत्वाची साक्ष आहे.
 जय भवानी साखर कारखान्याच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात देखील त्यांनी कार्यक्षमता ,शेतकऱ्यांना न्याय्य हक्क, सुचारू व शिस्तबद्ध व्यवस्थापन यावर विशेष भर त्यांचा दिसून येतो. उत्पादन क्षमतेबरोबरच शेतकरी व कामगार वर्गाचा सन्मान जपण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा विशेष ठरतो. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च मानून पारदर्शक कारभाराचा आदर्श त्यांनी घालून दिला.
धार्मिक क्षेत्रातही नेहमी अग्रेसर असणारे भाऊ दरवर्षी आपल्या सहकाऱ्यांसोबत आषाढी वारीला पंढरपुरच्या विठ्ठलाचे पायी चालत जाऊन दर्शन घेतात.
शिक्षण, सहकार, उद्योग व शेती ही सर्व क्षेत्र सचोटीने सांभाळण्याचे सामर्थ्य आदरणीय भाऊंमध्ये आहे.
त्यांच्या जनकल्याणकारी कार्यामुळे त्यांच्यावर असलेला लोकांचा दृढ विश्वास आपल्याला नेहमी पहावयास मिळतो.
त्यांच्या कार्याचा गाभा म्हणजे लोकाभिमुखता, प्रामाणिकपणा आणि दीर्घकालीन दृष्टिकोन शिक्षक दिनी जन्मदिन असलेल्या या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजाला घडविणाऱ्या शिक्षकासारखा मार्गदर्शनशील दृष्टिकोन आणि सर्वांगीण विकासासाठी असलेली कटिबद्धता . जनकल्याण, सेवाभाव आणि सचोटीचा दीपस्तंभ.
शिक्षकदिनी जन्मदिन असलेले आदरणीय जयसिंग भाऊ पंडित हे स्वतः समाजाचे खरे शिक्षक आहेत —
“शब्दांनी नव्हे तर कार्याने शिकवणारे.”
आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा..
              लेखक
प्रा.अजय पांडुरंग रत्नपारखे
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,पाचेगाव
Back to top button