रणवीर पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना किराणा वाटप

रणवीर पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना किराणा वाटप
गेवराई | प्रतिनिधी
गेवराई येथील सह्याद्री फर्निचरचे सर्वेसर्वा श्री. दत्ताभाऊ पिसाळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत उमापूर येथील गरजवंत, निराधार आणि वयोवृद्ध अशा पाच कुटुंबांना धान्य बँकेच्या माध्यमातून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा किराणा संच देऊन मदतीचा हात दिला. यावेळी गेवराई तालुक्याचे युवानेते तथा शारदा अकॅडमीचे अध्यक्ष श्री. रणवीर पंडित (काका) यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते लाभार्थींना किराणा वाटप करण्यात आले. सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक रावसाहेब देशमुख, गेवराई तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन जयदीप औटी, माजी पंचायत समिती सभापती शिवाजी कापसे, ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार अझहरभाई इनामदार, ग्रामपंचायत सदस्य पप्पू शेठ राऊत, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ राऊत, फादर विनोद कापसे, माऊली पिंगळे, दत्ताभाऊ औटी, प्रवीण आहेर सर, समाजसेवक सुभाष काळे सर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



