📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये ध्वजारोहण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये ध्वजारोहण

बीड, दि.१७ – मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल, बीड येथे बुधवार (दि.१७) रोजी ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात मराठवाड्याच्या मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांना अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता शाळेच्या प्राचार्या सौ. उमा जगतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

ध्वजारोहणानंतर उपस्थित सर्वांनी भारतीय तिरंग्याला मानवंदना अर्पण केली. या प्रसंगी शाळेतील शिक्षक-शिक्षिका, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button