सध्याच्या पिढीला जिजाऊंच्या विचारांची गरज – प्राचार्य विकी घायतडक

सध्याच्या पिढीला जिजाऊंच्या विचारांची गरज – प्राचार्य विकी घायतडक
राजमाता जिजाऊ माँसाहेब पुण्यतिथीनिमित्त पॉलिटेक्निकमध्ये अभिवादन
जामखेड : आजच्या काळात जिजाऊ माँसाहेबांचे विचार प्रत्येक स्त्री-पुरुषाने अंगीकारणे गरजेचे आहे. समाजात महिलांचा सन्मान, शिक्षणाची गरज, आणि संस्काराची परंपरा टिकवणे हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.म्हणून आपण त्यांच्या विचारांचे अनुकरण करून आपल्या समाजाला अधिक सशक्त, स्वावलंबी आणि संस्कारी बनवू या,सध्याच्या पिढीला जिजाऊंच्या विचारांची गरज आहे.असे मत डिप्लोमा काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी कॉलेज चे प्राचार्य विकी घायतडक यांनी व्यक्त केले.
जामखेड येथील दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकमध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालक अनिल वाळुंजकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्राचार्य विकी घायतडक,प्रा.किशोर हुंबे,प्रा.जयसिंग पवार,प्रा.पूनम कांबळे,प्रा.आश्विनी पोटफोडे,प्रा.माधुरी म्हेत्रे, सिनिअर क्लर्क सविता सुतार, लिपिक संतोष जगताप,प्रतिक उदारे,विजय घोडके,
सौरभ पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.



