जनविश्वास, विकास आणि जनसेवेचा निष्ठावंत सेवेकरी.! राजेंद्र मस्के

जनतेचा विश्वास आणि प्रगतीच्या पाऊलवाटेवरील
उमदे नेतृत्व!
लोकविश्वासाची अखंड परंपरा जपणारा लोककार्यकर्ता
“नेतृत्व म्हणजे केवळ पदाचा मान नव्हे; तर लोकांच्या आशा-आकांक्षांना दिशा देत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची अखंड सेवा साधना होय.”
या विचाराचे कृतीत रूपांतर करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के हे आज बीड जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनातील धडडीचे संयमी, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
बदलत्या राजकीय वातावरणात जनमानसाचा विश्वास संपादन करणे जितके कठीण असते, तितकेच तो दीर्घकाळ टिकवून ठेवणे अधिक आव्हानात्मक असते. मात्र सर्वसामान्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून सातत्याने कार्य करत राजेंद्र मस्के यांनी आपल्या कर्तृत्वाची कसोटी यशस्वीपणे पार केली. लोकसेवेलाच ध्येय मानून त्यांनी सार्वजनिक जीवनाचा मार्ग स्वीकारला आणि कृतीच्या बळावर समाजमनात अढळ स्थान निर्माण केले.
दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. प्रशासनाची सखोल जाण, ग्रामीण भागातील प्रश्नांचे अचूक आकलन आणि शेतकरी, शेतमजूर तसेच सर्वसामान्य नागरिकांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद यामुळे त्यांची कार्यपद्धती अधिक परिणामकारक ठरली आहे.
“जो माणूस लोकांच्या वेदनांना स्वतःच्या वेदना समजतो, लोकांच्या अपेक्षांचा मान राखतो आणि संविधानिक मूल्यांशी निष्ठा जपतो, तोच राजकीय पटलावर आणी काळाच्या कसोटीवर खरा लोकप्रतिनिधी ठरतो.”
याच विचारधारेतून त्यांनी आपली वाटचाल घडवली. जातीय किंवा भावनिक ध्रुवीकरणा ऐवजी सामाजिक समता, विश्वासार्हता, पारदर्शकता आणि जनकल्याण या मूल्यांवर आधारलेले राजकारणच समाजाला योग्य दिशा देऊ शकते, अशी त्यांची ठाम धारणा आहे.
मराठा महासंघ, शिवसंग्राम आणि भारतीय जनता पक्षातील संघटनात्मक कार्यातून त्यांनी नेतृत्व, संघटनबांधणी आणि जनसंपर्काचे धडे आत्मसात केले. कार्यकर्त्यांशी असलेली आत्मीयता आणि प्रत्येक गावाशी जपलेली नाळ यामुळे त्यांचा लोकसंग्रह अधिक दृढ होत गेला.
समाजहिताची तळमळ, विकासात्मक दृष्टिकोन, राजकीय परीपक्वता, संघटनकौशल्य आणि सामाजिक बांधिलकी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू आहेत. शब्द आणि कृती यांतील एकरूपता जपत नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते विकास, सेवा आणि जनसंपर्क या त्रिसूत्रीच्या आधारावर आपली राजकीय जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत आहेत. बदलत्या परिस्थितीत ही त्यांनी लोकांशी असलेले आत्मीय नाते अधिक बळकट केले.
“शेतकरी हा देशाचा कणा आहे” या भावनेतून त्यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. सिंचन, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी केलेला त्यांचा पाठपुरावा ग्रामीण विकासाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे.
सत्ता असो वा विरोधी बाक सर्वसमावेशक प्रगतीचा ध्यास त्यांनी जपला. लोकहिताच्या विषयांवर सातत्याने पाठपुरावा करत प्रत्येक गावाशी आणि प्रत्येक कुटुंबाशी त्यांनी विश्वासाचे दृढ बंध निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले.
अभ्यासपूर्ण चिंतन, मंथन करत व्यापक दृष्टीने भेदा भेद न करता सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कार्यपध्दती यामुळे राजेंद्र मस्के हे आज बीड जिल्ह्यातील प्रभावी, कर्तृत्ववान आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून जनमानसात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले.
सुनितीचा मार्ग, स्वच्छ नियत, संघर्षाची ताकद आणि संस्कारांची आणी अनुभवाची शिदोरी ज्यांच्या कडे असते, त्यांच्या आयुष्यात यश हे योगायोगाने नव्हे तर कर्तृत्वाच्या बळावर निश्चितपणे प्राप्त होणारे मधुर फळ असते. राजेंद्र मस्के यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास या विचाराची प्रचिती येते. लोकांचा स्नेह, सहकाऱ्यांची साथ आणि विकासकामांची भक्कम पायाभरणी यांच्या जोरावर त्यांनी स्वतःची स्वतंत्र व प्रभावी ओळख निर्माण केली.
सार्वजनिक जीवनाला केवळ सत्तेचे साधन न मानता समाजसेवेचे प्रभावी माध्यम मानणाऱ्या राजेंद्र मस्के यांनी आपल्या कार्यातून लोकाभिमुख राजकारणाचा आदर्श निर्माण केला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता, समाजहिताची बांधिलकी आणि विकासकेंद्री विचारसरणी यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र सातत्याने विस्तारत असून लोकमानसातील त्यांचा स्वीकार अधिक दृढ होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बदलत्या राजकीय समीकरणा मध्ये ही त्यांच्या विषयीचा जनाधार कायम आहे. विकासाभिमुख दृष्टी, अनुभवाची शिदोरी, सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ यामुळे भविष्यातही
त्यांच्या कडून प्रभावी योगदानाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जनसंपर्काची मजबूत परंपरा, सहकाऱ्यांचा भक्कम पाठिंबा आणि केलेल्या कामांचा ठसा यांच्या बळावर आगामी लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील निवडणुकीतही त्यांना मतदार बंधु भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल आणि विजयाचा गुलाल उधळला जाईल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
“जनतेचा विश्वास हीच खरी शक्ती, विकास हाच खरा जनसेवा हाच धर्म आणि जीवनाचा मार्ग” लोकशाहीतील या जीवनमूल्यांना कृतीतून जपणारे राजेंद्रजी मस्के यांचे नेतृत्व आगामी काळातही जनतेच्या आशा-आकांक्षांना नवी दिशा देत राहो. विकासाच्या वाटचालीला अधिक बळ मिळो, समाजहिताचे कार्य अधिक व्यापक होवो आणि जनसेवेचा त्यांचा प्रवास उत्तरोत्तर अधिक यशस्वी, प्रेरणादायी व लोककल्याणकारी ठरो, हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा!
—– मारूती तिपाले, बीड



