शिवांश स्किन-हेअर-लेझर क्लिनिकचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

शिवांश स्किन-हेअर-लेझर क्लिनिकचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
जामखेड : आधुनिक त्वचा व केस उपचारांसाठी प्रसिद्ध असलेले जामखेड शहरातील ‘शिवांश स्किन – हेअर – लेझर क्लिनिक’ यंदा आपल्या यशस्वी वाटचालीचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त 18 मे 2025 रोजी सकाळी 11.55 ते सायंकाळी 7.30 या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी डॉ.प्रियांका पवार, डॉक्टर विकास दळवी, शुभम वारे, ओंकार गवळी, अथर्व झोडगे, सुनील वारे आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या एक वर्षात त्वचा व केसां संदर्भातील विविध उपचारांसाठी लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभल्याने क्लिनिकने अल्पावधीतच आपल्या सेवेचा ठसा उमटवला आहे. नागरिकांच्या सौंदर्य व आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन लेझर ट्रिटमेंट, स्किन पी.आर.पी., टॅटू काढणे, अनावश्यक केस घालवणे व हेअर पी.आर.पी. यांसारख्या आधुनिक उपचार सुविधा येथे उपलब्ध आहेत.फॅट कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे मशिन उपलब्ध आहे.योग्य पध्दतीने उपचार केले जातात.यामुळे फॅट कमी करण्यासाठी मदत होते.
“गेल्या वर्षभरात लोकांनी दाखवलेल्या प्रेमामुळेच आजचा दिवस घडला आहे. यासाठी सर्वांचे आभार मानण्यासाठीच हा स्नेहमेळावा आयोजित केला आहे,” अशी भावना क्लिनिकच्या डॉ . प्रियांका पवार यांनी व्यक्त केली.



