बीड
सोहम बोराडेची एमबीबीएस साठी निवड

सोहम बोराडेची एमबीबीएस साठी निवड
जामखेड प्रतिनिधी – जामखेडचे कर्तव्यदक्ष तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल बोराडे यांचा चिरंजीव सोहम बोराडे याची एमबीबीएस साठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना बौद्धाचार्य आव्हाड म्हणाले,सोहम बोराडेची निवड समाजासाठी अभिमानास्पद असून त्यांनी एमबीबीएस साठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अशोक आव्हाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रा.कुंडल राळेभात, सेंच्युरी स्कूलचे अध्यक्ष शिवाजी काळदाते सर,युवा कार्यकर्ते मनोज कार्ले, दादा महाडिक, व्यापारी गणेश घोलप, प्रा.राहुल आहिरे,बुध्दभुषण आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.



