स्वातंत्र्यदिनी : राजुरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सरपंच सागर कोल्हे यांच्या वतीने सत्कार

स्वातंत्र्यदिनी : राजुरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सरपंच सागर कोल्हे यांच्या वतीने सत्कार
न्यू इंग्लिश स्कूल राजुरी विद्यालयामध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
जामखेड प्रतिनिधी -दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल राजुरी, येथील विद्यालयामध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त
वि.का.से.सो. राजुरी चेअरमन
हरिदास शिवदास उगलमुगले
यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राजुरी गावच्या सरपंच सौ. अश्विनीताई सागर कोल्हे तसेच पोलीस पाटील दत्तात्रय मोरे सागर कोल्हे, निलेश कोल्हे शा.व्या. समिती अध्यक्ष, श्रीराम काळदाते पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष,मेजर सतीश कोल्हे, रामभाऊ कोल्हे, अशोक खाडे, साईनाथ मोरे, सुभाष घुले (माजी उपमुख्याध्याप ल
.ना. होशिंग विद्यालय), काकासाहेब कोल्हे, शुभम पुलावळे ,संजय चौधरी,दत्तात्रय पिसाळ,भरत कोल्हे,हौसराव समुद्र,बाळू मोरे, संदीप पिसाळ,सुरज गायकवाड ( ग्रामपंचायत सदस्य राजुरी), संगीता पवार,राधा कोल्हे, कविता कोल्हे, विजया काळजाते, श्रीमती चंदाराणी (सुरवसे आरोग्य सेविका) विद्या कोल्हे, ज्योती सदाफुले,वंदना अडाले, सुनीता कोल्हे, संगीता मोरे (ग्रां.प सदस्य) लोचना लटपटे, राधा कोल्हे, रामकुमार कोल्हे ,शंकर लटपटे,अशोक जायभाय,शहाजी कोल्हे,दादासाहेब कोल्हे, नितीन मोरे, अभिषेक राळेभात, निलेश कोल्हे,शांतीलाल भोरे, महादेव गिरी, ओमसाई कोल्हे, शिवम कोल्हे, ओंकार कोल्हे, सचिन नन्नवरे, कृष्णा भालेकर,रेवण गायकवाड, मोमीन रफिक बाबुमियाॅं आदी महिला भगिनी
तसेच सर्व ग्रामस्थ मान्यवर, तरुण वर्ग शिक्षण प्रेमी शिक्षण तज्ञ ग्रामपंचायत सदस्य,सेवा सोसायटी सदस्य या कार्यक्रमासाठी मोठ्या उपस्थित होते.
यावेळी कॅनरा बँकेचे उकिरडे साहेब ब्रँच मॅनेजर, जायभाय साहेब या कार्यक्रमाला उपस्थित होते.कॅनरा बँकेची विद्या ज्योती शिष्यवृत्ती या योजनेद्वारे विद्यालयातील विद्यार्थिनींना पाचवी ते सातवी 3000 रूपये व आठवी ते दहावी 5000 रुपये अशी सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे उकिरडे साहेबांनी सांगितले व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त बँकेद्वारे मदत कशी करता येईल तसेच बँकेच्या योजनेविषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले.
गावातील अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांसाठी पार्ले बिस्कीट बाॅक्स चॉकलेट्स देऊन विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत व संगीत कवायतला ग्रामस्थांनी,ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारीसेवा सोसायटी सदस्यांनी बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.
यावेळी प्रमुख पाहुणे हरिदास शिवदास उगलमुगले (वि.का.से.सो.चेअरमन) यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून यश मिळवावे असे प्रतिपादन केले. व स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सरपंच अश्विनीताई कोल्हे यांनी स्वातंत्र्यासाठी सैनिकांनी बलिदान केले त्यांचे विषयी कृतज्ञता, आदर, प्रेम सन्मान व्यक्त केला व सैनिकांना अभिवादन केले .देशासाठी प्राण त्याग बलिदान देणाऱ्या स्वातंत्र सैनिकां प्रति आदर व्यक्त केला.
उपसरपंच नानासाहेब खाडे यांनीही देशाप्रती बलिदान देणाऱ्या सैनिकां विषयी आदर व्यक्त केला त्यांचे कार्य खूप मोठे आहे त्याग मोठा आहे.खरच त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही सैनिकांच्या शौर्याला, पराक्रमाला सलाम व्यक्त केला.
श्री सागर कोल्हे (सरपंच )यांनी मार्च 2024-25 मध्ये इयत्ता दहावी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव केला. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त गुण मिळवावेत व यश संपादन करावे तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे मार्गदर्शन केले.
शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व शाळेत राबविले जाणारे उपक्रम याविषयी माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड,राजेंद्र पवार,श्रीमती सुनीता पिसाळ, सुभाष बोराटे, जुबेर सय्यद, क्षीरसागर विजय, अक्षय मोहिते, शशिकांत सदाफुले,अनिकेत चौभारे,उमराव लटपटे,हनुमान राऊत व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.



