बीड

जवळा येथे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान शिबिर व किर्तन सोहळा

जवळा येथे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान शिबिर व किर्तन सोहळा

आजिनाथ हजारे युवा मंचाच्या पुढाकारातून विविध उपक्रमाचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा वाढदिवस नववर्षाच्या पहिल्या दिवशी, १ जानेवारीला येत असून, या शुभदिनाचे औचित्य साधून जवळा येथे सकाळी ९.०० ते ५.०० वा.रोजी भव्य सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे चेअरमन आजिनाथ हजारे यांच्या संकल्पनेतून व आजिनाथ हजारे युवा मंचाच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वाढदिवस हा केवळ औपचारिक उत्सव नसून, तो समाजहिताचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपत साजरा व्हावा, असे प्रतिपादन प्रा. शिंदे यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत, नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन या शिबिरात नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. आरोग्यविषयक समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आजिनाथ हजारे यांनी केले.
दरम्यान,महाराष्ट्रातील लोकप्रिय युवा किर्तनकार झी-टॉकीज फेम ह.भ.प. सोपान (दादा) कनेरकर यांची किर्तनसेवा १ जानेवारी २०२६ रोजी सायं. ६ ते ८ या वेळेत होणार असून, पंचक्रोशीतील भाविकांनी या दोन्ही उपक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Back to top button