जामखेड पोलीसांची नियमबाह्य वाहनांवर दंडात्मक कारवाई

जामखेड पोलीसांची नियमबाह्य वाहनांवर दंडात्मक कारवाई
खर्डा चौकात नाकाबंदी; ३ दिवसांत ५१ केसेस, ४५ हजारांचा दंड वसूल
जामखेड प्रतिनिधी: शहरातील खर्डा चौक परिसरात जामखेड पोलीसांनी सलग तीन दिवस राबवलेल्या नाकाबंदी मोहिमेत एकूण ५१ केसेस दाखल करत तब्बल ४५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिली.
२/- आगामी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे,पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील खर्डा चौक येथे वाहतूक शिस्त राखण्यासाठी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
या नाकाबंदी करिता सहायक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव, पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे, सहायक फौजदार शिवाजी कदम, पोलीस नाईक रविंद्र वाघ, पोलीस कॉन्स्टेबल सचिन चव्हाण, कुलदीप घोळवे, आकाश शेवाळे, ईश्वर परदेशी, योगेश दळवी, श्रीकांत शिंदे, गणेश काळाणे, ज्ञानेश्वर बेल्हेकर, प्रकाश जाधव, दत्तु बेलेकर तसेच होमगार्ड स्टाफ यांच्यासह नाकाबंदी दरम्यान विना नंबर, विदाऊट हेल्मेट, काळ्या काचा, ट्रिपल सिट इत्यादीवर खालीलप्रमाणे कारवाई करून दंड आकारण्यात आला आहे.
नाकाबंदीची आकडेवारी –
२८ डिसेंबर २०२५ – २६ केसेस, दंड २६,००० रुपये
२९ डिसेंबर २०२५ – १२ केसेस, दंड १२,००० रुपये
३० डिसेंबर २०२५ – १३ केसेस, दंड ८,००० रुपये
एकूण – ५१ केसेस, दंड ४५,०००/-
या कारवाईचा एकूण उद्देश नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे, तसेच हेल्मेट, वाहन क्रमांक प्लेट, पारदर्शक काचा याबाबत जागरूकता निर्माण होणे हा असल्याचे पोलीसांनी सांगितले. यापुढेही शहरातील वाहतूक शिस्त भंग करणाऱ्यांवर व रोड रोमिओ यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी दिला.



