बीड
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आ. विजयसिंह पंडित धावले खामगाव आणि नांदूर हवेली येथील पुरातन अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आ. विजयसिंह पंडित धावले
खामगाव आणि नांदूर हवेली येथील पुरातन अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न
गेवराई दि.२२ (प्रतिनिधी) गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये गोदावरी आणि शिंदफणा नदीने उग्र रुप धारण केल्यामुळे परिसरात पूरग्रस्त परिस्थिती गंभीर बनली असून माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांनी पूरग्रस्त परिसराचा दौरा करून पूरग्रस्तांना दिलासा दिला. आ. विजयसिंह पंडित यांनी बीड तालुक्यातील आणि गेवराई विधानसभा मतदारसंघातील खामगाव आणि नांदूर हवेली या सिंदफणा नदीच्या पाण्याने वेढलेल्या परिसराला भेट दिली असून त्यांनी पुरात अडकलेल्या अनेक लोकांची प्रशासनाच्या मदतीने सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाथसागरातून सोडलेल्या पाण्याच्या पाण्यामुळे गोदावरी नदीपात्रात पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे राक्षस गोदावरी नदी काठावरील अनेक गावांना याचा तडाका बसला आहे त्याचबरोबर गेवराई तालुक्यातून जाणाऱ्या सिंदफणा नदीमध्येही आज अचानक वाढलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती गंभीर बनली. पूरग्रस्त भागाचा माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांनी दौरा केला. आ. विजयसिंह पंडित यांनी बीड तालुक्यातील खामगाव आणि नांदूर हवेली या ठिकाणी दुपारी भेट दिली. चार तास थांबून प्रशासनाच्या मदतीने पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न केले. शेतकरी आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रशासकीय मदत मिळवून देण्यासाठी आणि झालेल्या नुकसान भरपाईसाठी आपण प्रयत्न करू असे सांगून लोकांना धीर न सोडण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह महसूल मंडळाचे अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते



