बीड

प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एड्स जनजागृती व्याख्यान संपन्न

प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एड्स जनजागृती व्याख्यान संपन्न
नेकनूर प्रतिनिधी :प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एड्स जनजागृती व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोरे मॅडम उपस्थित होत्या तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ढास डी.के. हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक इनकर व्ही.एस. यांनी केले त्यांनी प्रास्ताविकेमध्ये विद्यार्थ्यांना एड्स विषयी जनजागृती करण्यासाठी अशा व्याख्यानमालेची गरज आहे व त्यामधून विद्यार्थ्यांनी आरोग्य संबंधी जागृत होणे गरजेचे आहे. असे सांगितले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना एड्स विषयी आपण जागृत राहिले पाहिजे व बाल वयातून प्रोढ वयामध्ये आपण पदार्पण करत असताना शरीरामध्ये होणारे बदल जाणून घेतले पाहिजे व मुला मुलींनी याविषयी काळजीपूर्वक माहिती जाणून घेतले पाहिजे तसेच युवा पिढीने एड्स विषयी संरक्षण करण्यासाठी सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे तसेच जर तो आजार झाला असेल तर लपवून न ठेवता आपण जिल्हा आरोग्य केंद्राशी संपर्क केला पाहिजे व त्यावर उपचार घेतला पाहिजे समाजामध्ये अशा व्यक्तीला दूर न करता त्याला सन्मानाने वागणूक दिली पाहिजे असे आपले मत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. डी. के. ढास यांनी विद्यार्थ्यांनी एड्स विषयी माहिती घेणे गरजेचे आहे. व सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे तसेच एड्स चे संरक्षण करण्यासाठी सुरक्षित बाळगणे गरजेचे आहे. असे आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आणि आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रामरुले डी.के. यांनी केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button