बीड

जामखेड येथे विश्वक्रांती मित्र मंडळाचे पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन

जामखेड येथे विश्वक्रांती मित्र मंडळाचे पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन

जामखेड प्रतिनिधी:गेल्या २६ वर्षांपासून जामखेड शहरातील आदर्श व प्रतिष्ठीत म्हणून ओळखले जाणारे विश्वक्रांती मित्र मंडळ यंदाही गणेशोत्सवानिमित्त पारंपारिक पद्धतीने विसर्जन कार्यक्रम राबवत समाजासाठी आपले योगदान ठेवले.

यावेळी बोलताना नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले की,गणेशोत्सव हा आपल्या परंपरेची आणि भक्तीची ओळख आहे. ध्वनी प्रदूषण टाळत पारंपारिक पद्धतीने विसर्जन करणे आमच्या मंडळाचे उद्दीष्ट आहे.

गणरायाचे विसर्जन विश्व क्रांती चौक, बीड रोड, जय हिंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ व संविधान चौक मार्गे भक्तीभावात करण्यात आले. या मिरवणुकीत श्री दत्त योगीराज वारकरी शिक्षण संस्थेचे
भव्य टाळ, मृदंग, पखवाज व टाळकरी वारकरी सहभागी झाले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील डी.जे मुक्त वातावरण राखत, ध्वनी प्रदूषण टाळण्याची दक्षता घेतली गेली. मंडळाने राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करत पारंपारिक पद्धतीने विसर्जन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Back to top button