बीड

जिजाऊंच्या विचारांनीच सामाजिक एकता आणि संस्कारांचे बळ मिळते – मंगेश (दादा) आजबे

जिजाऊंच्या विचारांनीच सामाजिक एकता आणि संस्कारांचे बळ मिळते – मंगेश (दादा) आजबे

जिजाऊ रथयात्रेचे जामखेड येथे ; शंभूराजे कुस्ती संकुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य स्वागत

जामखेड प्रतिनिधी │ १५ जूनजिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रेचे आज जामखेड शहरात शंभूराजे कुस्ती संकुल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि “जय जिजाऊ, जय शिवराय” च्या जयघोषात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या स्वागत सोहळ्याची थाटामाटात सुरुवात मंगेश आजबे यांच्या कार्यालयासमोर झाली.

यावेळी बोलताना मंगेश आजबे म्हणाले की,जिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊंच्या विचारांनीच आपल्याला सामाजिक एकतेचे व संस्काराचे बळ मिळते. तसेच भविष्यात तरुण पिढीला योग्य दिशा मिळेल.

यावेळी जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, शंभूराजे कुस्ती संकुलचे प्रमुख मंगेश आजबे, माजी सभापती सुर्यकांत मोरे, हरिभाऊ बेलेकर, शहाजी राळेभात, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रकाश काळे, काकासाहेब राळेभात, कुंडल राळेभात, समीर चंदन, बंडू मुळे, उमर कुरेशी,शरद शिंदे,माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, माजी सरपंच बापूसाहेब कार्ले, अँड. हर्षल डोके, प्रविण उगले,हरिभाऊ आजबे, पांडुरंग माने, गणेश हागवणे, अँड. ऋषिकेश डुचे, पै. बापू जरे, पै. चिराग आजबे, तुषार गोलेकर यांच्यासह शंभूराजे कुस्ती संकुलचे अनेक पैलवान व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही रथयात्रा दिनांक १४ जून रोजी सकाळी ८.३० वाजता मातृतिर्थ सिंदखेडराजा येथून प्रस्थान करून चार दिवसांचे स्मृतिज्योत रथयात्रा नियोजित करण्यात आली आहे. पाचाड येथील जिजाऊ समाधीस्थळी सिंदखेडराजा येथील पाच विहिरींच्या जलाने पुण्यतिथीच्या दिवशी जलाभिषेक होणार आहे.

Back to top button