मुंबईचे डॉ भांगरे माजलगावकरासाठी रोज उपलब्ध

मुंबईचे डॉ भांगरे माजलगावकरासाठी रोज उपलब्ध
माजलगाव:
शहरातील डॉ यशवंत राजेंभोसले यांच्या यशवंत हॉस्पिटल येथे मुबंई येथील प्रसिद्ध ह्रदयविकार तज्ञ डॉ प्रतीक भांगरे हे 1 जानेवारी पासून दररोज उपलब्ध झाले आहेत. यामुळे माजलगाव च्या वैद्यकीय क्षेत्रात रुग्णासाठी हक्काचे व प्रदीर्घ अनुभव असलेले 24 तास सुविधा देणारे डॉक्टर उपलब्ध झाले आहेत.
डॉ प्रतिक भांगरे हे मूळ नगर येथील असून वोकहार्ट फोर्टिस हॉस्पिटल मुबंई येथे त्यांनी इंटरव्हेशनल कर्डीयॉलॉजिस्ट आणि कारडिओथोरेसिक सर्जन सोबत काम केले आहे. तसेच नेफ्रॉलोजी रेजिडेंट म्हणून कॅडेव्हेरिक लिव्हिंग डोनर रेनल ट्रान्सप्लांट चा अनुभव, डायलीसिस व लिव्हर ट्रान्सप्लांट आयसीयू रजिस्ट्रार म्हणून मोठा अनुभव आहे.डॉ वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक येथे ट्रामा आणि सर्जरी आय सी यु चें इन्टेन्सिवीस्ट तसेच राजीव गांधी मेडिकल कॉलेज येथे विषबाधा आणि सर्प दंशाच्या आपत्कालीन प्रकरणाचा अनुभव, तसेच जिल्हा रुग्णालय नाशिक येथे ए एस व्ही वापराचे मानकिकरण करून 30 व्हायलंची मर्यादा वैध्यकीय अधिकाऱ्याचे प्रशिक्षण आदी चा प्रदीर्घ अनुभव डॉ प्रतिक भांगरे यांना असल्यामुळे माजलगाव सह जिल्ह्यातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.
न्यूमोनिया, डायलीसिस, पॅरालिसीस, ह्रदयविकार, विषबाधा सारख्या प्रकरणात तात्काळ उच्च दर्जाचे उपचार आता माजलगावं सारख्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
चौकट
महात्मा फुले व प्रधानमंत्री आरोग्य योजनेत मोफत उपचार
यशवंत हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले व प्रधानमंत्री आरोग्य योजने अंतर्गत कॅन्सर, मुतखडा, गर्भपिशवी, अंजीओग्राफी, अंजिओप्लास्टि व हाडाच्या शस्त्रक्रिया होत आहेतच आता डॉ भांगरे मुळे यां योजने अंतर्गत विषबाधा व ह्रदयाशी निगडित आजरावरही उच्च दर्जाचे उपचार मिळणार आहेत.
चौकट
2015 च्या कुंभमेळ्याच्या आपत्कालीन तयारीचे फर्स्ट रिस्पॉन्डर आणि बेसिक लाईफ सपोर्ट चें प्रशिक्षण शिवाय सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज बेंगरूळू येथे ई आय सी यु व इमरजन्सी मेडिसिन चें प्रशिक्षण डॉ भांगरे यांनी घेतलेले असल्यामुळे माजलगाव पंचक्रोशीतील रुग्णासाठी मोठ्या शहरात जाण्याची आवश्यकता आता भासणार नाही.



