बीड
धामणगांव येथील नियमानुसार अतिक्रमण न काढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अन्याय-सामाजिक कार्यकर्ते विजय गाढवेचा आरोप

धामणगांव येथील नियमानुसार अतिक्रमण न काढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अन्याय-सामाजिक कार्यकर्ते विजय गाढवेचा आरोप
कडा प्रतिनिधि ;-बीड अहिल्यानगर राज्य महामार्गावरील धामणगांव येथे वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण हटविण्यात आले असुन हे अतिक्रमण हटविताना नियमानुसार न हटवल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व अधिकारी यांच्या कडून अन्याय झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय (आण्णा ) गाढवे यांनी केला आहे.
बीड धामणगांव अहिल्यानगर राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी लोकांनी अनाधिकृतपणे अतिक्रमणे केले होते.यामुळे राज्य महामार्गावर वाहतूकीस अडथळा होत असल्याने आष्टी तालुक्यातील धामणगांव ते दौलावडगांव या रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढण्यात आले.अतिक्रमण केलेल्या लोकांना सूचना देऊन चूना टाकून तशी हद्द निश्चित केली आहे.कोणाचे वैयक्तिक नुकसान होऊ नये म्हणून अतिक्रमण काढण्यासाठी आठ दिवसाचा वेळ देण्यात आला होता.या कालावधीत स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरील अतिक्रमण हटविण्यात येणार होते. शनिवारी सकाळपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली होती.पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हद्दीतील जुन्या नालीलगत अतिक्रमण काढली नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांच्या कडून अन्याय झाल्याचा आरोप विजय गाढवे यानी केला आहे.



